मुंबई - Robert DowneyJr : अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU)मध्ये परत येत असल्यानं, मार्वल चाहते उत्साहित आहेत. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटांची मनोरंजनाच्या जगात वेगळीच क्रेझ आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियर पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर मार्वल सुपरहिरोजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी आयर्न मॅन हा आपला धमाकेदार अंदाज त्याच्या चाहत्यांना पडद्यावर दाखवणार आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील उत्सुक आहे. रॉबर्ट डाउनी जूनियर डॉक्टर डूमच्या भूमिकेत मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये दिसणार आहे. रॉबर्टनं सॅन दिएगो कॉमिक कॉन इव्हेंटमध्ये या बातमीची पुष्टी केली.
कॉमिक-कॉन कार्यक्रमादरम्यान झाली घोषणा : 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' हा चित्रपट 2026मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. सॅन दिएगो येथे आयोजित कॉमिक-कॉन कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. ॲव्हेंजर्स फ्रँचायझीमधील ब्लॅक विडोच्या भूमिकेसाठी सर्वत्र ओळखली जाणारी स्कार्लेट जोहान्सन सुद्धा मार्वल प्रोजक्टमध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, मार्वल स्टुडिओ अध्यक्ष केविन फीगे यांनी पुष्टी केली की, ते खरोखरच स्कार्लेटच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. 2023 मध्ये कॉमिकबुकशी संभाषणात, स्कार्लेट जोहान्सननं देखील या प्रोजेक्टचा उल्लेख केला होता.
रॉबर्ट डाउनी ज्युनियरची भूमिका : जेम्स मँगॉल्ड दिग्दर्शित 'लोगान' या चित्रपटात ह्यू जॅकमन हा सुपर हिरोच्या भूमिकेत दिसला होता. जॅकमननं सातत्यानं सांगितलं आहे की, तो एक्स-मेन पात्र पुन्हा भूमिका करणार नाही. तरीही, तो 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन'मधून पडद्यावर परतला. याशिवाय 'ॲव्हेंजर्स: डूम्सडे' चित्रपटामध्ये क्रिस इव्हान्स आणि वेस्ली स्नाइप्स हे कलाकार देखील दिसणार आहे. रुसो ब्रदर्सच्या ॲव्हेंजर्स चित्रपटानं जागतिक स्तरावर प्रचंड यश मिळवलं आहे. दरम्यान रॉबर्ट डाउनी ज्युनियरनं देखील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यानं चाहत्यांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "नवीन मुखवटा, पण तेच कार्य." नवीन ॲव्हेंजर्स चित्रपटात रॉबर्टची भूमिका खलनायकाची असणार आहे.