ETV Bharat / entertainment

मकबूलची 20 वर्षे : नजरेमुळे मिळाली इरफानला भूमिका तर 'सत्या'मुळे मुकला मनोज बायपेयी - इरफान खान

Maqbool at 20: विशाल भारद्वाज दिग्दर्शित मकबूल चित्रपटाला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. इरफान खान आणि तब्बू यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट, मॅकबेथच्या शेक्सपियरच्या शोकांतिकेचे स्क्रीन रूपांतर आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत बनवलेल्या सर्वोत्कृष्ट क्राईम ड्रामापैकी एक मानल्या जाणाऱ्या कालातीत चित्रपटाबद्दलच्या मनोरंजक माहितीसाठी वाचा.

Maqbool at 20
मकबूलची 20 वर्षे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 5:35 PM IST

मुंबई - Maqbool at 20: वीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे ३० जानेवारी २००४ रोजी मकबूल हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या क्राईम ड्रामा चित्रपटात शेक्सपियरच्या मॅकबेथ या शोकांतिकेचे स्क्रीन रूपांतर दाखवण्यात आले होते. हा चित्रपट अभिनेता इरफान खानच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा चित्रपट होता. इरफानने यापूर्वी उत्कृष्ट अभिनय केला असला तरी, मकबूल चित्रपट त्याच्यासाठी मुख्य प्रवाहातील प्रकल्प म्हणून उभा राहिला, कारण त्याच्या किंवा विशाल भारद्वाजच्या चित्रपटांना सामान्यत: व्यावसायिक चित्रपट असे लेबल चिकटले नाही.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात कथेचा सूत्रधार असलेल्या इरफान खानने मियाँ मकबूलची व्यक्तिरेखा साकारली आहे. पडद्यावर नेहमीच वर्चस्व गाजवत नसतानाही इरफान जेव्हा अभिनय करतो, तेव्हा तो एक चिंतनशील वृत्तीने किंवा एक डॉन आणि एक प्रियकर अशा दोन्ही रूपात त्याच्या प्रवासाचा डावपेच आखत असतो. पंकज कपूर, तब्बू, ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांसारख्या दिग्गजांसह स्क्रिन शेअर करून, इरफानने निर्विवादपणे बाजी मारली होती.

या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेसाठी दिग्दर्शक विशाल भारद्वाजच्या डोक्यात सुरुवातीला के के मेनन आणि कमल हासन सारख्या कलाकारांचा विचार होता. मात्र तिग्मांशु धुलियाच्या हासिल या क्राइम ड्रामा चित्रपटातील इरफानची भूमिका पाहून तो प्रभावित झाला आणि त्याला खात्री पटली की मकबूलच्या भूमिकेसाठी इरफानच योग्य अभिनेता आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात, जेव्हा विशालला विचारले गेले की तो मकबूलसाठी इरफानचे ऑडिशन केली होती का तेव्हा त्याने खूप मजेशीर उत्तर दिले. तो म्हणाला, "इरफानचे ऑडिशन घेण्याचे धाडस कोण करू शकते? सर्वात मोठा मूर्ख इरफानचे ऑडिशन घेईल," तो पुढे म्हणाला की ही भूमिका इरफानच्या प्रभावी डोळ्यांमुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या विलक्षण गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याकडे गेली."

विशेष म्हणजे, मनोज बाजपेयी देखील या मुख्य भूमिकेसाठी खूप उत्सुक होता आणि त्यानं विशालशी अनेकदा संपर्कही साधला होता. त्याच्या दुर्दैवाने, विशालने इतर पर्याय शोधला कारण राम गोपाल वर्माच्या सत्यामध्ये मनोज बाजपेयीने आधीच गुंड भिकू म्हात्रेची भूमिका साकारली होती.

मकबूल चित्रपट बनवण्याचा प्रवास विशाल भारद्वाजसाठी सोपा बिल्कुल नव्हता. मुख्य भूमिकांसाठी इरफानची निवड करण्यापासून ते त्याचे मानधन देण्यापर्यंत भारद्वाजने स्वतःला पूर्णतः समर्पित केले. इरफानसाठी, मकबूल हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला होता.

मकबूलशी संबंधित काही ठळक गोष्टी :

मकबूलचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांनी सर्व कलाकारांसाठी कार्यशाळा घेतले होते. त्याकाळी, कार्यशाळा ही सामान्य गोष्ट नव्हती, परंतु मीरा नायरने मान्सून वेडिंग चित्रपटासाठी हा प्रयोग केला आणि त्याला यश मिळाले. यावरुन मकबूल चित्रपटाच्या टीमने प्रेरणा घेतली होती.

सुरुवातीला पंकज कपूरला काकासाठी (पीयूष मिश्रा यांनी तेलेली भूमिका) कास्ट केले होते, दिग्दर्शक विशाल भारद्वाजने नंतर त्याला मकबूलमध्ये अब्बाजीच्या भूमिकेत कास्ट केले.

नसीरुद्दीन शाह यांनी मॅकबेथमधील पंकज कपूरची भूमिका नाकारली आणि कॉन्स्टेबलच्या भूमिकेला प्राधान्य दिले.

सुरुवातीला मकबूलसाठी निवडण्यात आलेल्या के के मेननकडे तारखा नसल्यामुळे त्याला या चित्रपटाला मुकावे लागले.

मनोज बाजपेयीने विशाल भारद्वाजला मकबूलमध्ये मुख्य भूमिकेत कास्ट करण्यासाठी सतत 21 कॉल केले होते.

शूटिंग सुरू होण्याच्या पंधरवड्यापूर्वी, विशाल भारद्वाज चित्रपट सोडण्याच्या मार्गावर होता कारण निर्मात्याने संपूर्ण क्रूला मध्य प्रदेशातील भोपाळला जाण्याचा खर्च देण्यास नकार दिला होता.

हेही वाचा -

1 विक्रांत मॅसीनं आयपीएस मनोज शर्मासोबत शेअर केला फिल्मफेअर अवॉर्ड

2. धनुषचे तिरुपतीच्या रस्त्यावर शूटिंग, बघ्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडी

3. "प्रेक्षकांनी त्यांच्या हृदयात स्थान दिले", शाहरुख खानची 'दिल से' प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.