ETV Bharat / entertainment

कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल, फहद फासिलसह दिग्गज प्रतिभावंतांचा 'मनोरथंगल' ट्रेलर रिलीज - Manorathangal Trailer - MANORATHANGAL TRAILER

Manorathangal Trailer : 'मनोरथंगल' या आगामी ट्रेलरमध्ये विविध कथांची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रमालिकेमध्ये कमल हासन, मोहनलाल, मामूट्टी, फहद फासिल आणि इतर अभिनीत नऊ चित्रपट आहेत. आठ चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शित केलेला हा सुंदर चित्रकथा संग्रह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एमटी वासुदेवन नायर यांच्या प्रतिष्ठित कथांचे रूपांतर आहे.

Manorathangal Trailer
'मनोरथंगल' ट्रेलर रिलीज (Manorathangal poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 16, 2024, 12:21 PM IST

मुंबई - Manorathangal Trailer : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आणि चित्रपट निर्माते एम. टी. वासुदेवन नायर यांनी लिहिलेल्या नऊ चित्रपटांची चित्रमालिका प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 15 जुलै रोजी एमटी वासुदेवन नायर यांच्या वाढदिवसानिमित्त, निर्मात्यांनी मनोरथंगल ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं. या चित्रमालिकेत कमल हासन, मोहनलाल, मामूट्टी आणि फहद फासिल यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यातील नऊ चित्रपटामध्ये या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. आठ दिग्दर्शकांनी कुशलतेने दिग्दर्शित केलेल्या या वैविध्यपूर्ण कथनांची एक वेधक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

'मनोरथंगल' या चित्रमालिकेची निर्मिती सलग तीन वर्षाच्या अखंड कामानंतर पूर्ण झाली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि प्रशंसनीय दिग्दर्शकांचा एक मोठा समूह एकत्र आला होता. प्रत्येक चित्रपट वासुदेवन नायर यांनी रचलेल्या अद्वितीय आणि प्रतिष्ठित कथेवर आधारित आहे. आता या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर लॉन्च झाला आहे.

सुमारे दोन मिनिटांचा ट्रेलरमध्ये कमल हासन एम. टी. वासुदेवन नायर यांच्या अक्षर प्रतिभेला अभिवादन करताना दिसतात. या चित्रमालिकेतील विविध प्रसंग ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात. मोहनलालचा भाग मोनोक्रोममध्ये लक्षवेधक आहे, तर मामूट्टीने तीव्रता आणि नाट्यमय मनोरंजनाची खात्री दाखवली आहे. फहद फासिलदेखील त्याच्या अभिनयाची जादु दाखवताना प्रभावी वाटत आहे. या दिग्गजांव्यतिरिक्त, कथासंग्रहात मधु, पार्वती थिरुवोथू, आसिफ अली, बिजू मेनन, शांती कृष्णा, नादिया मोईडू, इंद्रांस, दिवंगत नेदुमुदी वेणू, सुरभी लक्ष्मी, सिद्दिकी, इंद्रजित सुकुमारन आणि अपर्णा बालमुरली प्रमुख भूमिकेत आहेत. कमल हासनचा सहभाग प्रकल्पाची प्रतिष्ठा आणखी अधोरेखित करतो.

'मनोरथंगल' १५ ऑगस्ट रोजी मल्याळम, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदीमध्ये ZEE5 वर प्रीमियर करण्यासाठी सज्ज होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.