ETV Bharat / entertainment

मनोज बाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त 'भैय्या जी'मधील 'बाघ का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज - manoj bajpayee birthday - MANOJ BAJPAYEE BIRTHDAY

Bagh Ka Kareja Teaser : मनोज बाजपेयीच्या वाढदिवसानिमित्त 'भैय्या जी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'बाग का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज केला आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

Bagh Ka Kareja Teaser
बाग का करेजा टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 23, 2024, 5:59 PM IST

Updated : Apr 24, 2024, 4:40 PM IST

मुंबई - Bagh Ka Kareja Teaser : हिंदी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेता मनोज बाजपेयी आज 55 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्तानं त्यांच्या आगामी 'भैय्या जी' या चित्रपटातील'बाग का करेजा' या गाण्याचा टीझर रिलीज केला असून, हे गाणे उद्या म्हणजेच 24 एप्रिल रोजी रिलीज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कार्की यांनी केलंय. याआधी त्यांनी बाजपेयींचा कोर्टरूम ड्रामा 'एक बंदा काफी है'चं दिग्दर्शित केलं होतं. 'भैय्या जी' हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. त्याआधीही प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी निर्माते चित्रपटातील काही अपडेट्स शेअर करत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'बाघ का करेजा' गाण्याचा टीझर रिलीज : मनोज बाजपेयी यांचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त निर्मात्यांनी चित्रपटाच्या 'बाघ का करेजा' या नवीन गाण्याचा टीझर रिलीज करून चाहत्यांना एक भेट दिली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत. दरम्यान 'बाघ का करेजा' हे गाणं मनोज तिवारी गायलं आणि संगीतबद्ध देखील केलं आहे. याशिवाय या गाण्याला संगीत हे आदित्य देव यांनी दिलं आहे. 'बाघ का करेजा'चे बोल डॉ. सागर यांनी लिहिलं आहे. विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, शैल ओसवाल, समिक्षा ओसवाल, शबाना रझा बाजपेयी आणि विक्रम खाखर यांनी निर्मित केलेला हा चित्रपट भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, एसएसओ प्रॉडक्शन्स आणि औरेगा स्टुडिओज यांच्यातील सहयोगाद्वारे तयार केला गेला आहे.

'भैय्याजी' टीझरला चांगला प्रतिसाद : या गाण्याच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याआधी 'भैय्या जी'चा टीझर रिलीज झाला होता, जो प्रेक्षकांनाही खूप आवडला होता. मनोजनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता आणि कॅप्शन देत यावर लिहिलं होतं, "आता निवेदन नाही, नरसंहार होईल, भैय्या जी'ची पहिली झलक आली आहे. 24 मे पासून चित्रपटगृहांमध्ये पाहा." या टीझरमध्ये मनोज हा एका गुंडाच्या भूमिकेत दिसला होता. या टीझरमध्ये त्याचा थरारक लूक दिसला होता. हा टीझर पाहून अनेकांना 'गैंग्स ऑफ वासेपुर'ची आठवण झाली होती.

हेही वाचा :

  1. मीरा कपूरबरोबर रोमँटिक डिनर डेट दरम्यान पापाराझींना पाहून शाहिद कपूर झाला संतप्त - shahid kapoor
  2. आरती सिंहच्या हळदी समारंभामधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल - Arti singh Haldi
  3. हृतिक रोशनचा डान्स बघून मनोज वाजपेयीच्या नृत्य करण्याच्या स्वप्नाचा झाला चुराडा - MANOJ BAJPAYEE

Last Updated : Apr 24, 2024, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.