ETV Bharat / entertainment

मन्नारा चोप्रानं जिममध्ये केलं पदार्पण, व्हिडिओ केला शेअर - mannara chopra debuts at gym - MANNARA CHOPRA DEBUTS AT GYM

Mannara Chopra : मन्नारा चोप्रानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

Mannara Chopra
मन्नारा चोप्रा (मन्नारा चोप्रा (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 5:28 PM IST

मुंबई -Mannara Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण मन्नारा चोप्रानं 'जिद' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. मन्नारा चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. आता मन्नारा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिनं पहिल्यांदाच जिममध्ये पाऊल ठेवलं आहे. मन्नारानं सांगितलं की तिनं जिममध्ये पदार्पण केलंय. मन्नारानं जिममधून वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत ती जांभळ्या रंगाच्या जिम आउटफिटमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.

मनारा चोप्रा बद्दल : मन्नारानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जिममधून केलेल्या वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "जिममध्ये पदार्पणात स्वागत आहे." मन्नारा तिच्या जिम आउटफिटमध्ये खूप बोल्ड दिसत आहे. तिचा हा जिम लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. मन्नाराच्या म्हणण्यानुसार, तिनं यापूर्वी कधीही जिममध्ये वर्कआउट केलेलं नाही. तसेच आता तिच्या या व्हिडिओच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिचं कौतुक करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "मन्नारा तुझा हा लूक खूप सुंदर आहे, थोडी बारीक झाल्यावर आणखी चांगली दिसणार." दुसऱ्या एकानं लिहिलं, "मन्नारा मेकअपशिवाय चांगली दिसते." आणखी एकानं लिहिलं, "मन्नारा तू खूप सुंदर दिसत आहेत." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

मन्नारा चोप्राचं वर्कफ्रंट: मन्नारानं 2014 साली तेलुगू चित्रपट 'प्रेमा गीमा जंतनाई'तून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. यानंतर तिचा 'जिद' हा बॉलिवूड चित्रपट आला. या चित्रपटानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. मन्नारानं बहुतेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मन्नाराचा मागील हिंदी चित्रपट 'हाले दिल ऑन ब्रोकन नोट्स' आहे. याशिवाय ती 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. या शोमध्ये ती टॉप 3मध्ये आली होती. मात्र हा शो मुनावर फारुकीनं जिंकला होता. मन्नाराचे इंस्टाग्रामवर 4.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल ? - Chandu Champion
  2. अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'औरों में कहाँ दम था'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - AURON MEIN KAHAN DUM THA TRAILER
  3. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालची 'लग्न पत्रिका' लीक, बोहल्यावर चढण्यासाठी जोडी उतावीळ - Sonakshi Sinha Wedding Invitation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.