मुंबई - Manisha Koirala : अलीकडेच ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक हे ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्यापेक्षाही श्रीमंत झाल्याची बातमी समोर आली होती. सध्या सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईरालानं ब्रिटनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. मनीषानं या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मनीषा कोईराल ही एकमेव नेपाळी अभिनेत्री आहे जी आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहे. ब्रिटन आणि नेपाळमधील मैत्री कराराला 100 वर्षे पूर्ण होत असताना मनीषा प्रतिनिधी म्हणून ब्रिटनला पोहोचली होती. विशेष म्हणजे या प्रसंगी मनीषाची प्रमुख भूमिका असलेल्या 'हीरामंडी' या वेब सीरीजमधल्या तिच्या अभिनयाचं थेट ब्रिटनच्या पंतप्रधान आवासातील स्टाफनं कौतुक केलं.
मनीषा कोईरालानं घेतली पंतप्रधान सुनकची भेट : मनीषानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पीएम सुनकबरोबर उभी असून हसताना दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंवर अनेकजण कमेंट्समार्फत तिचं कौतुक करताना दिसत आहेत. मनीषानं पोस्टवर शेअर करत लिहिलं, 'यूके आणि नेपाळ यांच्यातील मैत्री कराराला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मला पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित केल्यानं खूप आनंद झाला.' मनीषा कोईराला नेपाळी राजकारणी प्रकाश कोईराला यांची मुलगी असून तिचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान (1959-1960) होते. दरम्यान मनीषा कोईराला नुकतीच 'हीरामंडी' वेब सीरीजमध्ये दिसली होती. ब्रिटनच्या पंतप्रधान निवासातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मनीषा कोईरालाची सध्या गाजत असलेली 'हीरामंडी' वेब सीरीज पाहिल्याचं आणि त्यांना ती आवडल्याचं आवर्जून सांगितलं.
ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती : गेल्या एका वर्षात पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत बरीच वाढ झाली आहे. एका रिपोर्टनुसार, या हायप्रोफाईल जोडप्याच्या संपत्तीत एका वर्षात 120 दशलक्ष पौंडांनी वाढ झाली आहे. हा अहवाल आल्यानंतर ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांची संपत्ती ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्यापेक्षा जास्त झाल्याचा दावा केला जात आहे. ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती अनेकदा भारतात काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये येत असतात. दरम्यान मनीषा कोईरालाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे आणखी काही प्रोजेक्टस् आहेत.
हेही वाचा :
- कोलकाता नाईट रायडर्सनं सामना जिंकल्यानंतर शाहरुख खान झाला खूश, चाहत्यांकरिता दिली सिग्नेचर पोझ - Shah rukh Khan signature pose
- करण जोहरच्या आगामी चित्रपटात आयुष्मान आणि साराची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार - AYUSHMANN AND SARA ALI KHAN
- मिसेस माही जान्हवी कपूरचं क्रिकेट बॉल हॅन्ड बॅगमधील क्लीन बोल्ड लूक व्हायरल - mrs mahi janhvi kapoor