मुंबई - भारतीय सिनेमाचा उलगनायगन कमल हासन आज आपला 70 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला शुभेच्छा देण्यासाठी दक्षिणेतील प्रतिभावान दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटाचा टिझर आज लॉन्च करण्यात आला. या बहुप्रतीक्षित टिझरमध्ये कमल हासनची एक जबरदस्त झलक पाहायला मिळत आहे. 'नायकन' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या तब्बल 35 वर्षानंतर कमल हासन आणि मणिरत्नम ही जोडी 'ठग लाईफ'मध्ये पहिल्यांदा एकत्र येणार असल्यामुळे या चित्रपटाकडे जगातील तमाम कमल हासन प्रेमी रसिकांचं लक्ष आहे.
'ठग लाईफ' या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकीजने गेल्या वर्षी केली होती. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. काही दिवसापूर्वी याचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मणिरत्नम यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता पराकोटीला गेली आहे.
Every role is an evolution, every film a journey. #Thuglife
— Kamal Haasan (@ikamalhaasan) November 7, 2024
Tamil - https://t.co/l0vV3Bj8PV#ThugLifeFromJune5th
A #ManiRatnam Film
English - https://t.co/iGO09uI4iA
Telugu - https://t.co/PiDhkHYLf1
Kannada - https://t.co/5qWWnuSPO4
Malayalam - https://t.co/urzDBqiXHu@RKFI… pic.twitter.com/fce2NdrP8g
कमल हासन आमि मणिरत्नम यांच्या आजवरच्या लौकिकाला शोभेल असाच 'ठग लाईफ'चा टिझर आहे. यामध्ये कमल हासन पुन्हा एकदा एका चाणाक्ष, शक्तीमान ठगाच्या भूमिकेत दिसत आहे. यातील दृष्ये डोळ्यात साठवून ठेवावीत अशीच आहेत. वेगवान अॅक्शन, साहसी दृष्ये आणि नेत्रदीपक सेट यांचा नजारा या झलकमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे 'ठग लाईफ'ची गेल्या अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपत आली आहे. या टिझरच्या शेवटी 'ठग लाईफ' चित्रपटाच्या रिलीजची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कमल हासनला एका आक्रमक अवतारात पाहण्यासाठी अजून काही महिन्यांची प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागणार आहे.
मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' या हा चित्रपट एक गँगस्टर ड्रामा म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात जयम रवी, त्रिशा, अभिरामी आणि नासर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिलं आहे. चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि कमल हासन या जोडीचा करिष्मा नव्या पिढीला पहिल्यांदाच ठग लाईफच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.