मुंबई - Malaika Arora and Arjun Kapoor: अभिनेत्री मलायका अरोरानं आज 26 जून रोजी अर्जुन कपूरच्या 39व्या वाढदिवसानिमित्त एक क्रिप्टो पोस्ट शेअर केली आहे. मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. काल रात्री, मलायका अर्जुनच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित न राहिल्यानं ब्रेकअपच्या अफवांना उधाण आलंय. मलायकानं अद्याप अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. मात्र तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं की, "मला असे लोक आवडतात ज्यांच्यावर मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकते." मलायकानं या पोस्टवर कोणतेही कॅप्शन दिलेले नाही.
मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप : मलायका आणि अर्जुननं 2019 मध्ये त्यांच्या डेटिंग लाइफला अधिकृत केलं होतं. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र दोघांनीही अजून लग्न करण्याचा निर्णय घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या. नुकतेच दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे. मात्र, अर्जुन आणि मलायका या दोघांनीही या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. मलायकाच्या मॅनेजरनं या ब्रेकअपच्या अफवांचं सातत्यानं खंडन केलं आहे. या अफवांना पूर्णविराम देण्यासाठी खूप प्रयत्न करण्यात आला होता. या सर्व अफवा आहेत, असं काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं.
अर्जुन कपूरची बर्थडे पार्टी : अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीबद्दल बोलायचं झालं तर वरुण धवन, नताशा दलाल आणि आदित्य रॉय कपूर सारखे स्टार्सही या कार्यक्रमात उपस्थित होते. आता या पार्टीत मलायकाची अनुपस्थितीही ब्रेकअपच्या बातम्यांना बळ देत आहे. दरम्यान वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन कपूरचे 2 चित्रपट सध्या रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. तो 'मेरी पत्नी का रीमेक' या चित्रपटात दिसणार आहे, तर दुसरीकडे तो रोहित शेट्टी आणि अजय देवगण स्टारर 'सिंघम अगेन' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळणार आहे. अर्जुन कपूरच्या पात्राचं नाव 'डेंजर लंका' असेल. या चित्रपटाचा टीझर अद्याप रिलीज झालेला नाही.
हेही वाचा :
- प्रिन्स नरुला आणि युविका चौधरीच्या घरी होईल छोट्या पाहूण्याचं आगमन, केली पोस्ट शेअर - yuvika chaudhary pregnancy
- क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं कार्तिक आर्यन स्टारर 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाचं केलं कौतुक - chandu champion
- झहीर इक्बालनं पत्नी सोनाक्षी सिन्हाला गिफ्ट केली बीएमडब्लू आय 7 कार - Zaheer Iqbal and Sonakshi Sinha