ETV Bharat / entertainment

बीच व्हॅकेशनमध्ये मिस्ट्री मॅनबरोबर दिसली मलायका अरोरा, फोटो व्हायरल - malaika arora

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 2:57 PM IST

Malaika Arora : मलायका अरोरानं तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्याबरोबर एक मिस्ट्री मॅन दिसत आहे. आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाली आहे.

Malaika Arora
मलायका अरोरा (Malaika Arora - instagram)

मुंबई - Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या सौंदर्य आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा ती तिच्याविषयी अपडेट शेअर करत असते. मलायका अरोरा सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. तिच्या बीच व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलीकडेच, तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. फोटोमध्ये तिच्या जवळ भरपूर खाद्यपदार्थ आणि एक मिस्ट्री मॅनही दिसत आहे. आता अनेकजण हा फोटो पाहिल्यानंतर ती नात्यात असल्याच्या चर्चा करत आहे.

मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुललं ? : मलायका पुन्हा कोणालातरी डेट करत आहे आणि ती त्या व्यक्तीबरोबर सुट्टी देखील साजरी करत आहे. अर्जुन कपूरबरोबरच्या ब्रेकअपनंतर मलायकाच्या आयुष्यात पुन्हा प्रेम फुलले आहे. तिच्या आयुष्यात एका व्यक्तीनं प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. मलायकानं शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा हा स्पष्ट दिसत नाही. मात्र हा व्यक्ती पांढऱ्या शर्टमध्ये असल्याचं दिसत आहे. मलायका स्वादिष्ट पदार्थाबरोबर समुद्राच्या सौंदर्याचा आनंद घेत आहे. आता या सुंदर क्षणामध्ये ती एकटी नसून तिच्याबरोबर मिस्ट्री मॅन आहे.

मलायका अरोराची पोस्ट चर्चेत : या अफवांवर मलायका अरोरानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता सोशल मीडियावर सुरू असलेले दावे कितपत खरे आहेत हे सांगणे कठीण आहे. आजकाल मलायका तिच्या गर्ल गँग आणि कुटुंबाबरोबर जास्त वेळ घालवताना दिसते. अलीकडे ती कोणत्याही चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये दिसलेली नाही. मलायका अनंत आणि राधिकाच्या लग्नातही सहभागी होऊ शकली नाही. मात्र तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून या जोडप्यावर अभिनंदनचा वर्षाव केला होता. अनंत आणि राधिका यांच्या लग्नात अर्जुननं हजेरी लावल्यानं तिनं या लग्नात येण्याचं टाळलं असल्याचं देखील अनेकजण सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन म्हणत आहेत.

हेही वाचा :

  1. मलायका अरोरानं टाळली अर्जुन कपूरच्या वाढदिवसाची पार्टी, विभक्त होण्याच्या अफवा नसून सत्य? - Malaika Arora and ARJUN KAPOOR
  2. अर्जुन कपूरनं मलायकाबरोबर विभक्त होण्याच्या अफवांदरम्यान केला धक्कादायक फोटो शेअर - arjun kapoor
  3. "भूतकाळाच्या पिंजऱ्यात अडकायचं की भविष्याचा वेध घ्यायचा..." : अर्जुन कपूरची गूढ पोस्ट - Arjun Kapoor Cryptic Post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.