ETV Bharat / entertainment

‘अल्याड पल्याड’ चित्रपटात सिद्धयोगीच्या वेगळ्या भूमिकेत झळकणार मकरंद देशपांडे - Makarand Deshpande - MAKARAND DESHPANDE

Makarand Deshpande : ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात मकरंद देशपांडे एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल असं मकरंद यांनी म्हटलंय.

Makarand Deshpande
मकरंद देशपांडे (( Pic from movie 'Alyad Palayad' ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 4:23 PM IST

मुंबई - Makarand Deshpande : अतिशय निवडक आणि तरीही लक्षवेधी भूमिका करत रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर अभिनेता मकरंद देशपांडेनं अभिनय प्रतिभेचा जबरदस्त ठसा उमटवला आहे. या अवलिया कलाकारानं प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे त्याच्या नव्या चित्रपटाविषयी, त्याच्या भूमिकेविषयी रसिकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटात तो एका सिद्धयोगी साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षक भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून प्रीतम एस के पाटील यांनी दिग्दर्शन केलं आहे.

Makarand Deshpande
मकरंद देशपांडे (( Pic from movie 'Alyad Palayad' ))

आपल्या महाराष्ट्राला समुद्र किनारे, पर्वतरांगा, कड्या कपारी, जंगल, समृद्ध करणाऱ्या नद्या, अनेक जुन्या संस्कृती, भाषा, तसेच प्रथा, परंपरा अशी विविधता आहेत. अशाच एका वेगळ्या परंपरेची आराधना करण्याची प्रथा असणाऱ्या दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे.

आव्हानात्मक भूमिका करायला मला नेहमीच आवडतात. ‘अल्याड पल्याड’ मधली भूमिका एका मांत्रिकाची आहे. त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त झालेली नाही, त्यातून तो त्या गावाला कसा वाचवणार? याची अतिशय थरारक गोष्ट यात मांडण्यात आली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच खिळवून ठेवेल यात शंका नाही असं मकरंद देशपांडेने म्हटलंय.

गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर अशा नामवंत आणि नवोदित कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांनी केलं आहे. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी यांनी सांभाळला आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाचे लाईन प्रोड्यूसर दिपक कुदळे पाटील आहेत.

हेही वाचा -

  1. लोकसभा निवडणूक 2024 जिंकल्यानंतर कंगना रणौत करणार बॉलिवूडला टाटा बाय बाय... - kangana ranaut
  2. रवीना टंडनची मुलीसह ज्योतिर्लिंग यात्रा, भीमाशंकर मंदिरात घेतलं दर्शन - Raveena Tandon and Rasha
  3. अभिषेक बच्चन 'हाउसफुल 5' च्या स्टार स्टडेट कास्टमध्ये परतणार, साजिद नाडियाडवालाची घोषणा - Housefull 5

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.