ETV Bharat / entertainment

महेश मांजरेकर सध्याच्या परिस्थितीवर राजकीय चित्रपट निर्मिती करणार - Mahesh Manjrekar - MAHESH MANJREKAR

Mahesh manjrekar : अभिनेता महेश मांजरेकर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासंदर्भात महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ऐन निवडणुकीच्या मोसमात ही घोषणा सर्वांचंच लक्ष वेधत आहे.

Mahesh manjrekar
महेश मांजरेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 4:49 PM IST

मुंबई Mahesh manjrekar : मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आता चर्चेत आले आहेत. त्यांनी 28 मार्च रोजी मुंबईमधील दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती ही आज देशभरात साजरी केली जात आहे. दरम्यान या विशेष दिवशी महेश मांजरेकरांनी त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दल घोषणा केली आहे. मांजरेकर हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चित्रपट निर्मित करणार असल्याचं समजत आहे.

महेश मांजरेकर करणार राजकीय चित्रपटाती निर्मिती : मीडियाबरोबर बोलताना त्यांनी म्हटलं, "सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मी नक्की एखादा चित्रपट काढेन." महेश मांजरेकरांना यावेळी राजकीय प्रश्न विचारण्यात आले. यानंतर त्यांनी म्हटलं, "मी राजकारणासाठी नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमामध्ये आलो आहे." शिवाजी महाराज पार्कवर हा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीयेला झाला होता. तारखेनुसार शिवजयंती 19 फेब्रुवारीला आणि तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीयेला अशा दोन शिवजयंती साजरी करतात. यावर्षी तिथीनुसार शिवजयंती 28 मार्चला आली आहे.

'जुनं फर्निचर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित : महेश मांजरेकरांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी अनेक चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलंय. आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट लवकरच येणार आहे. 'जुनं फर्निचर' या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर दादर-शिवाजी पार्क येथे सलीम खान यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला होता. यावेळी महेश मांजरेकर व्यतिरिक्त अनुषा दांडेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर हे कलाकार उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट स्टारर चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार - Bobby Deol as a villain
  2. डॉली चायवाला सोहेल खानला मालदीवमध्ये भेटला; फोटो व्हायरल - Dolly chaiwala
  3. लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर कंगना रणौतनं केलं शाहरुख खानवर वक्तव्य - kangana ranaut

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.