मुंबई - Madhuri Dixit birthday : ज्येष्ठ अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही लोकांच्या मनावर राज्य करते. ती केवळ तिच्या अभिनयानं आणि नृत्यानंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या रीलमधूनही तिच्या चाहत्यांची मनं जिंकत असते. धक धक गर्लने तिच्या इंस्टाग्रामवर अनेक रील्स शेअर केले आहेत, यामध्ये तिच्या काही हिट रील्सचाही समावेश आहे. माझुरीनं तिचा जुना मित्र सुनील शेट्टीपासून ते करिश्मा कपूर, करण जोहर यांच्यासोबत रील्स बनवले आहेत. आज ती आपला 57 वा वाढदिवस साजरा करत असताना तिचे काही सर्वोत्कृष्ट रील्स पाहूयात.
माधुरी दीक्षितनं बॉलिवूडचा 'अण्णा' सुनील शेट्टीबरोबर काही रील केले आहेत. मार्चमध्येच, दोघांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक नवीन रील बनवली होती. यामध्ये ते 'दिल तो पागल है' मधील 'ढोलना' गाण्यावर स्टेप करताना दिसले होते. रीलमध्ये माधुरी लाल रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसत होती, तर डेनिम शर्ट आणि पांढरी पँट घातलेला सुनील शेट्टी आजच्या तरुण कलाकारांना स्पर्धा देताना दिसला होता.
केवळ सुनील शेट्टीसोबतच नाही तर अभिनेत्री माधुरीनं तिची खास मैत्रीण करिश्मा कपूरबरोबरही 'ये जवानी है दिवानी'मधील 'बलम पिचकारी' या गाण्यावर माधुरीनं करिश्माबरोबर डान्स केला.
सुनील शेट्टी आणि करिश्मा कपूर व्यतिरिक्त 'धक धक गर्ल'ने विकी कौशल, आयुष्मान खुराना, प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर, मनीष पॉल, तब्बू यांच्यासह अनेक स्टार्सबरोबर रील बनवली आहे. तिच्याकडे काही सिंगल रील देखील आहेत ज्यामध्ये ती ट्रेडिंग गाण्यांवर नाचताना दिसते. माधुरी दीक्षित आज ५७ वर्षांची झाली आहे. वयाच्या ५७ व्या वर्षीही ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कामगिरीतून चाहत्यांना प्रेरित करत असते.
हेही वाचा -
- कीर्ती सुरेश आणि राशी खन्नाच्या एअरपोर्ट लूकनं वेधलं नेटिझन्सचं लक्ष - Keerthy Suresh Airport look
- 'बजरंगी भाईजान' फेम मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रानं 10वीत मिळवले 83 टक्के गुण, ट्रोलर्सची केली बोलती बंद - harshaali malhotra
- माधुरी दीक्षितच्या चाहत्यानं मतदारांना जागरुक करत अनोख्या पद्धतीनं साजरा केला वाढदिवस - Madhuri Dixit birthday