ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया ३'मध्ये कार्तिक आर्यन आणि विद्या बालनबरोबर दिसणार माधुरी दीक्षित - भूल भुलैया ३

Madhuri Dixit Joins Bhool Bhulaiyaa 3 : 'भूल भुलैया 3' चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन आणि विद्या बालनबरोबर माधुरी दीक्षित माधुरी दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

Madhuri Dixit Joins Bhool Bhulaiyaa 3
माधुरी दीक्षित भूल भुलैया ३ मध्ये सामील झाली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 2:17 PM IST

मुंबई - Madhuri Dixit Joins Bhool Bhulaiyaa 3 : हिंदी चित्रपटसृष्टीतील आकर्षक अभिनेता कार्तिक आर्यन आता 'भूल भुलैया 2' नंतर 'भूल भुलैया 3'मधून रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. आता 'भूल भुलैया 3' चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट हाती आले आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीय. 'भूल भुलैया 3'मध्ये आता विद्या बालनची एन्ट्री झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा विद्या आपल्या अभिनयानं चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान, अनीस बज्मी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 'भूल भुलैया 3'मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' नावनं ओळखली जाणारी माधुरी दीक्षितही दिसणार आहे.

'भूल भुलैया 3'मध्ये काय असेल माधुरीची भूमिका ? : या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा 'मंजुलिका'च्या थरारक भूमिकेत दिसेल. यामध्ये कार्तिक आर्यनसह माधुरी दीक्षितही एक अनोखी भूमिका साकारणार आहे. याआधी कार्तिकला फक्त एका भूताचा सामना करावा लागला होता. आता 'भूल भुलैया 3'मध्ये त्याला दोन भुतांचा सामना करावा लागणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यात सुरू होणार आहे. 'भूल भुलैया 3'मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत असू शकतो. 'मेरे ढोलना' गाण्यावर नृत्य करताना विद्या बालन आणि कार्तिकची संयुक्त क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कार्तिकनं लिहिलं, ''मंजुलिका 'भूल भुलैया'च्या दुनियेत परतत आहे, विद्या बालनचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. 'भूल भुलैया 3' या दिवाळीत धमाका करणार आहे.''

कार्तिकच्या पोस्टवर दिल्या चाहत्यांनी प्रतिक्रिया : 'भूल भुलैया 3'चा नवा व्हिडिओ रिलीज होताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया या पोस्टवर येऊ लागल्या आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, ''आता अक्षय कुमारलाही परत घ्या.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, "हा चित्रपट पाहायला आणखी मजा येणार.'' आणखी एका चाहत्यानं लिहिलं की, '' 'रूह बाबा' आणि 'मंजुलिका'चा हा चित्रपट रोमांचक असणार आहे.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण हार्ट आणि फायर इमोजीही पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'शैतान'मधील 'खुशियां बटोर लो' गाण्याचा टीझर उद्या होणार रिलीज
  2. वरूण तेजनं 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'साठी रुहानी शर्माचं केलं स्वागत
  3. केट ब्लँचेट, डेव्हिड बेकहॅमसह 'बाफ्टा अवॉर्ड्स'मध्ये प्रेझेन्टर म्हणून सामील होणार दीपिका पदुकोण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.