ETV Bharat / entertainment

'ऑल आइज ऑन रफाह'ला आधी पाठिंबा देऊन पोस्ट डिलीट केल्याबद्दल माधुरी दीक्षित झाली ट्रोल - All Eyes on Rafah - ALL EYES ON RAFAH

All Eyes on Rafah : माधुरी दीक्षितने इंस्टाग्रामवरून 'ऑल आयज ऑन रफाह' पोस्ट डिलीट करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्ट डिलीट केल्यानंतर माधुरीला टीकेला सामोरं जावं लागत आहे.

Madhuri Dixit gets trolled
माधुरी दीक्षित झाली ट्रोल ((IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 10:25 AM IST

मुंबई - All Eyes on Rafah : इस्रायलनं गेल्या रविवारी रफाह कॅम्पवर हवाई हल्ला केला होता. विस्थापितांच्या तंबूवर झालेल्या हल्ल्यात पॅलेस्टिनी निरपराध लोकांसह लहान मुलं होरपळून मृत्यूमुखी पडली. आपल्याकडून चूक झाल्याची कबुलीही इस्रायलच्या पंतप्रधानांनी दिली होती.

या दु:खद घटनेनंतर जगभरात सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' मोहिमेला वेग आला. या मोहिमेत भारतीय सेलिब्रिटींनी उत्साहानं सहभाग घेतला. बॉलिवूड सेलिब्रिटी माधुरी दीक्षिंने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली, परंतु लवकरच तिनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीज डिलीट केल्या. यावर सोशल मीडिया यूजर्सच्या एका वर्गानं टीका केली आहे.

28 मे रोजी माधुरीनं पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ 'ऑल आइज ऑन रफाह' पोस्ट केली होती. मात्र, तिनं लवकरच ही पोस्ट डिलीट केली, त्यानंतर सोशल मीडिया यूजर्सकडून प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अभिनेत्री माधुरीनं अलीकडेच गुलाबी ड्रेसमधील एक रील शेअर केलं आहे, त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये युजर्सनी तिला पोस्ट हटवण्याचं कारणं विचारायला सुरुवात केली आहे.

एका युजरनं आपली निराशा व्यक्त करताना लिहिलं, ''काही लोकांच्या मते पोस्ट करणं आणि हटवणं अधिक दयनीय आहे''. एका यूजरनं लिहिलं आहे की, "माधुरी मॅडम असं का केलं? माफ करा यापुढं मी तुम्हाला फॉलो करणार नाही." आणखी एकानं लिहिलं, ''मॅडम, तुम्ही विरोध केल्यानंतर जिहादी इस्लामवाद्यांबद्दलची पोस्ट काढून टाकली.''

या सेलिब्रिटींनी दिला 'ऑल आयज ऑन रफाह'ला पाठिंबा

माधुरी दीक्षित व्यतिरिक्त, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर, अथिया शेट्टी, समंथा रुथ प्रभू, वरुण धवन स्वरा भास्कर, रश्मिका मंदान्ना, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, दिया मिर्झा, तृप्ती दिमरी इलियाना डीक्रूझ, नोरा फतेही यांच्यासह अनेक भारतीय सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर 'ऑल आइज ऑन रफाह' पोस्ट शेअर करून पॅलेस्टिनी लोकांना पाठिंबा दर्शवला आहे.

'ऑल आइज ऑन रफाह' म्हणजे काय?

रविवारी 27 मे रोजी इस्रायलनं गाझामधील रफाहमध्ये हवाई हल्ला केला होता. इस्रायलच्या या हल्ल्यात अनेक मुलांसह 40 हून अधिक पॅलेस्टिनी लोक ठार झाले. याचा अनेक देश आणि मानवाधिकार संघटनांनी निषेध केला आहे. सोशल मीडियावर मृतदेह आणि गंभीर जखमी पॅलेस्टिनींचे फोटो दिसू लागली, त्यानंतर 'ऑल आइज ऑन रफाह' असा मजकूर असलेला एक फोटो ट्रेंड होऊ लागला.

या चालू असलेल्या सोशल मीडिया मोहिमेचा उद्देश गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील शहराकडं लोकांचं लक्ष वेधणं आहे, जिथं लोकांना कोणत्याही मानवतावादी मदतीशिवाय छावण्यांमध्ये राहण्यास भाग पाडलं गेलं आहे. 'ऑल आइज ऑन रफाह' या पोस्टमध्ये लोकांना रफाहच्या भीषण परिस्थितीकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन करणारं छावण्यांचं शिबिरही दाखवण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलच्या हल्ल्यातून सुटल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोक या छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत.

हेही वाचा -

"ऑल आय ऑन रफाह" चळवळीसाठी प्रियांका, रश्मिका ते कीर्तीपर्यंत भारतीय सेलिब्रिटींनी उठवला आवाज - All Eyes On Rafah

नरेंद्र मोदी विजय होतील का? हिमालयात जाण्यापूर्वी रजनीकांतनं दिलं उत्तर, काय ते जाणून घ्या... - Rajinikanth

'पुष्पा 2'च्या दुसऱ्या गाण्यानं 'याड' लावलं, अल्लु अर्जुन आणि मंदान्नाच्या डान्स स्टेप्सची प्रेक्षकांना भुरळ - Pushpa 2 Angaaron Lyrical Video

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.