ETV Bharat / entertainment

'लव्ह यू फॉरएव्हर' म्हणत, वरुण धवनने पत्नी नताशा दलालला दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Varun Dhawan - VARUN DHAWAN

वरुण धवनने 8 मे रोजी त्याची पत्नी नताशा दलाल हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने कॅप्शनमध्ये तिच्याबद्दलचे प्रेम आणि कौतुक व्यक्त करून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Varun Dhawan and Natasha Dalal
वरुण धवन आणि नताशा दलाल ((Varun Dhawan and Natasha Dalal Instagram image ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 4:32 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने बुधवारी ८ मे रोजी त्याची पत्नी नताशा दलाल हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. वरुणने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर आपल्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांचा एक आकर्षक व्हिडिओ शेअर केला. आपली काळजी घेणाऱ्या पत्नीसाठी वरुणने एक हृदयस्पर्शी चिठ्ठीही लिहिली आहे.

वरुणच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये एका सुंदर पार्श्वभूमीवर एक व्हायोलिन वाजवत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ दिसत आहे. त्यांच्यातील एका खासगी मैफिलीतले हे क्षण व्हिडिओत दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या केअरटेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझ्यावर कायम प्रेम राहील."

दरम्यान, त्याच्या व्यावसायिक आघाडीबद्दल बोलायचे झाले तर, वरूण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव यासारख्या अनेक प्रभावी कलाकारांचा समावेश आहे. ए कालीश्वरन दिग्दर्शित 'बेबी जॉन' हा चित्रपट मुराद खेतानी, प्रिया ऍटली आणि ज्योती देशपांडे यांनी बनवला आहे.

'बेबी जॉन' व्यतिरिक्त, वरुण धवनने अलीकडेच त्याच्या रोमँटिक कॉमेडी 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' चित्रपटासाठीचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटात बवाल मधील त्याची सहकलाकार जान्हवी कपूरबरोबर त्याचं पुनर्मिलन होणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात सान्या मल्होत्रा, रोहित सराफ आणि मनीष पॉल यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. 18 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार असलेल्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटाची चाहत्यांना खूप अपेक्षा आहे.

'सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपट 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' नंतर वरुणचा शशांक खेतानबरोबरचा हा तिसरा चित्रपट आहे. तर 'धडक' चित्रपटात पदार्पण केल्यानंतर जान्हवीचा दिग्दर्शक खेतान बरोबरचा हा दुसरा चित्रपट आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित त्यांच्या रोमँटिक बवाल चित्रपटानंतर वरुण आणि जान्हवी पुन्हा एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे.

वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू 'सिटाडेल: हनी बनी' या अ‍ॅक्शन-पॅक थ्रिलरमध्ये एकत्र काम करणार आहेत. राज आणि डीके यांनी दिग्दर्शित केलेली आणि के के मेनन आणि साकिब सलीम यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश असलेली ही मालिका 'सिटाडेल' या लोकप्रिय अमेरिकन शोचे भारतीय रूपांतर आहे.

हेही वाचा -

दीपिका पदुकोण, बिग बी आणि इरफान खान स्टारर 'पिकू'ला नऊ वर्षे पूर्ण - deepika padukone

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील फर्स्ट लूक रिलीज - janhvi kapoor and rajkummar rao

कार्तिक आर्यननं केलं सलग 18 तास शूटिंग, 'भूल भुलैया 3'वर व्हिडिओ शेअर - Kartik Aaryan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.