मुंबई Lok Sabha Election 2024 : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी आज मंगळवारी लातूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्यासाठी हे जोडपं आज सकाळीच मतदान केंद्रावर पोहोचलं होतं. जेनेलियाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
जेनेलिया मतदान करण्यासाठी रितेश देशमुखसह पिवळ्या रंगाच्या साडीत आली होती. प्रसारमाध्यमांशी तिनं मतदानाचं महत्त्व सांगितलं. ती म्हणाली: "हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि मला वाटते की आज प्रत्येकानं आपलं मत दिले पाहिजे..."
लातूर लोकसभा मतदार संघात मात्र गेल्या 10 वर्षांपासून भाजपाचा उमेदवार जिंकत आला आहे. 2014 मध्ये डॉ. सुनील गायकवाड तर 2019 मध्ये सुधाकर श्रृंगारे यांचा भाजपाच्या उमेदवारीवर विजय झालेला आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजपाकडून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसकडून डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मिळून 93 मतदारसंघांमध्ये मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सार्वत्रिक निवडणुकीचा तिसरा टप्पा मंगळवारी सकाळी 7 वाजता सुरू झाला आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 लोकसभा जागांसाठी मतदान सुरू झाले. आसाम (4), बिहार (5), छत्तीसगड (7), दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव (2), गोवा (2), गुजरात (25), कर्नाटक (14), महाराष्ट्र (11), मध्य प्रदेश (8), उत्तर प्रदेश (10) आणि पश्चिम बंगाल (4) या जागांसाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
सुरतची जागा भाजपने बिनविरोध जिंकली आहे. या टप्प्यात 1300 हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या शर्यतीत आहेत, त्यापैकी अंदाजे 120 महिला उमेदवार आहेत. या तिसऱ्या टप्प्यात 17.24 कोटी मतदारांना 1.85 लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येईल.
हेही वाचा -