ETV Bharat / entertainment

कुणाल खेमूनं मुलीसाठी उघडलं 'पापा पेडीक्योर', पाहा रंजक फोटो - सोहा अली खान

Kunal Kemmu Daughter: कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मुलगी इनायाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कुणाल पेडीक्योर करताना दिसत आहे.

Kunal Kemmu Daughter
कुणाल खेमूची मुलगी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 5:28 PM IST

मुंबई - Kunal Kemmu Daughter: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता कुणाल खेमू आणि सोहा अली खान यांची मुलगी इनायाचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. इनायाचे सुंदर फोटो अनेकांना आवडतात.आज 31 जानेवारी रोजी कुणाल खेमूनं आपल्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'पापा पेडीक्योर कंपनी.'' फोटोमध्ये कुणाल इनायाच्या लहान पायांना ग्रूम करताना दिसत आहे. या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कुणाल खेमूनं शेअर केला फोटो : एका सोशल मीडियावर एका यूजरनं या फोटोवर कमेंट्स करत लिहिलं, ''इनाया तू खूप क्यूट दिसत आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'हा फोटो खूप सुंदर आहे.' आणखी एकानं लिहिलं, ''कुणाल हा एक चांगला वडील आहे.'' अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. सोहा अली खाननं देखील हाच फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. या फोटोवर तिनं 'पापा' स्टिकर कॅप्शन दिलंय. सोहा आणि कुणालनं 2015 मध्ये अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलं होतं आणि 2017 मध्ये इनायाचा जन्म झाला. सोहा आणि कुणाल खेमू, प्रेमकहाणी 2009 मध्ये "ढुंढते रहे जाओगे"च्या सेटवर सुरू झाली. कुणाल सोहापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे.

वर्कफ्रंट : सोहा अली खान अनेकदा इनायासोबत व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. दरम्यान, कुणाल वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'मडगाव एक्स्प्रेस' या आगामी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यास सज्ज आहे. हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रतीक गांधी, अविनाश तिवारी, नोरा फतेही आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दुसरीकडे सोहाबद्दल बोलायचं तर ती शेवटची वेब सीरीज 'हुश हुश' मध्ये जुही चावला, कृतिका कामरा आणि करिश्मा तन्नासोबत दिसली होती. येत्या काही महिन्यांत ती 'छोरी 2' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाचे स्थळ ऐनवेळी बदलले, वाचा रंजक कारण
  2. सानिया मिर्झानं एकतर्फी घटस्फोट दिल्यानंतर पहिल्यांदाच शोएब मलिकनं सोडलं मौन
  3. तृप्ती डिमरीच्या बर्थडे पोस्टने सॅम मर्चंटसोबत डेटिंगच्या अफवांना पुन्हा उजाळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.