ETV Bharat / entertainment

कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली? काय आहे प्रकरण जाणून घ्या... - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED - KULWINDER KAUR IS STILL SUSPENDED

Kulwinder Kaur and Kangana Ranaut : कंगना राणौतला झापड मारणाऱ्या कुलविंदर कौरची बदली झाल्याच्या सध्या सोशल मीडियावर बातम्या पसरत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण वाचा सविस्तर...

Kulwinder Kaur and Kangana Ranaut
कुलविंदर कौर आणि कंगना राणौत (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 6:13 PM IST

मुंबई - Kulwinder Kaur and Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत यांना चंदीगड विमानतळावर झापड मारणारी महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्या बदलीशी संबंधित बातम्यांवर सीआयएसएफचं निवेदन जारी केलं आहे. सीआयएसएफच्या या वक्तव्यानं सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. दरम्यान कुलविंदर कौर यांची बदली झालेली नाही. चंदीगड विमानतळावर कंगना राणौतला झापड मारल्याच्या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. भाजपा खासदार कंगना राणौतला झापड मारणारी सीआयएसएफ कॉन्स्टेबला नोकरीवर परत बोलावण्यात आलं आहे. याप्रकरणी आणखी चौकशी केली जात आहे.

कंगना राणौत यांना झापड मारल्या प्रकरणी अपडेट : सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्यानं ईटीव्ही भारतला सांगितलं की, "भाजपा खासदार कंगना राणौत यांना झापड मारणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं होतं. तिच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू आहे." कुलविंदर कौरच्या बदलीच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं पसरत आहेत. दरम्यान 6 जून रोजी चंदीगड विमानतळावर ऑन ड्युटी सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरनं कंगना राणौत यांना झापड मारली होती. तिला झापड मारल्यानंतर लगेचच, कौरनं स्पष्टीकरण दिलं होत की तिनं शेतकरी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंजाबच्या महिलांबद्दल केलेल्या वक्त्यावर ती नाखूष होती, त्यामुळे तिला चिड आल्याचं म्हटलं होत.

कंगना राणौत केला होता व्हिडिओ जारी : नंतर कंगनानं एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितलं होतं की, "मला मीडिया आणि माझ्या हितचिंतकांकडून खूप फोन येत आहेत. मी सुरक्षित आहे, मी पूर्णपणे ठीक आहे. चंदीगड विमानतळावर आज जे घडलं ते सुरक्षा तपासणीदरम्यान घडलं. सुरक्षा तपासणीनंतर मी निघाले तेव्हा सीआयएसएफच्या जवानांनी माझ्या तोंडावर झापड मारली. तिनं मला शिवीगाळ केली. जेव्हा मी तिला विचारले की तिनं असं का केलं, तेव्हा तिनं मला सांगितलं की ती शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते. मी सुरक्षित आहे पण माझी चिंता ही आहे की पंजाबमधील दहशतवादाचा सामना कसा करायचा? " यानंतर कंगनाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.