ETV Bharat / entertainment

पुलकित सम्राटच्या दिल्लीतील घरी क्रिती खरबंदाचा भव्य गृह प्रवेश, पाहा व्हिडिओ - Kriti Kharbanda Griha Pravesh

Kriti Kharbanda Griha Pravesh: क्रिती खरबंदा ढोल-ताशांसह दिल्लीतील पुलकित सम्राटच्या घरात दाखल झाली आहे. आता या जोडप्याचे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Kriti Kharbanda Griha Pravesh
क्रिती खरबंदाचा भव्य गृह प्रवेश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 1:35 PM IST

मुंबई - Kriti Kharbanda Griha Pravesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट लग्नाच्या बेडीत 15 मार्च रोजी अडकले आहेत. या जोडप्यानं जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दिल्लीजवळील मानेसर येथील एका भव्य रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले आहेत. लग्नानंतर 16 मार्च रोजी संध्याकाळी क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट पहिल्यांदाच एकत्र दिसले. क्रिती लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या घरी पोहोचली. तिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान, तिनं तिच्या केसांमध्ये, सिंदूर, मॅचिंग ज्वेलरी आणि हातात लाल बांगड्या घालल्या होत्या. प्रिंटेड लाल रंगाच्या साडीत क्रिती खूपच सुंदर दिसत आहे.

पुलकित सम्राटही डॅशिंग लूक : व्हायरल व्हिडिओमध्ये पुलकित डॅशिंग दिसत आहे. यावेळी त्यानं पांढऱ्या रंगाच्या कुर्त्याबरोबर धोती परिधान केली आहे. व्हिडिओमध्ये पुलकित आणि क्रिती ढोल ताशांच्या तालावर डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय क्रितीची सासू तिला ओवाळून पैसे देताना दिसत आहे. या जोडप्याच्या लग्नानंतर त्यांच्या घरचे काही भव्य स्वागताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय क्रिती आणि पुलकितनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्यानं त्यांच्या लग्नात खूप सुंदर लुक केला होता. क्रितीनं तिच्या लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसत होती.

पुलकित आणि क्रितीची प्रेमकहाणी : याशिवाय पुलकितनं हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती. यावर त्यानं डोक्यावर मॅचिंग स्कार्फ बांधला होता. पुलकितच्या शेरवानीवर अनेक मंत्र लिहिलेले दिसत होते. त्याचा लग्नामधील हा लूक अनेकांना आवडला. या जोडप्याच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर, पुलकित आणि क्रिती 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. आधी दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात प्रेम झालं. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. सुरुवातीला दोघांनी डेटिंगच्या चर्चेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु दोघांनीही एकमेकांबरोबरचे नाते अधिकृतपणे स्वीकारले. पुलकित आणि क्रितीनं 'वीरे की वेडिंग', 'तैश' आणि 'पागलपंती' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. Ed Sheeran And Diljit Dosanjh: एड शिरीननं दिलजीत दोसांझबरोबर स्टेजवर गायलं पंजाबी गाणं, चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का
  2. Upasana meets President : राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला यांनी घेतली राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट
  3. Pulkit And Kriti Wedding : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांच्या लग्नातील फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.