ETV Bharat / entertainment

हावडा ब्रिजवर 'रूह बाबा'च्या अवतारात दिसला कार्तिक आर्यन - kartik aryan shares picture - KARTIK ARYAN SHARES PICTURE

Kartik Aaryan : कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3'च्या शुटिंगदरम्यान हावडा ब्रिजवरून एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो 'रूह बाबा'च्या शैलीत दिसत आहे.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 5:36 PM IST

मुंबई - Kartik Aaryan : बॉलिवूडमधील सुंदर अभिनेता कार्तिक आर्यन आगामी 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याचे चाहते देखील त्याच्या या आगामी चित्रपटाबद्दल अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आता अलीकडेच, कार्तिकनं त्याच्या प्रसिद्ध पात्र 'रूह बाबा'च्या लूकमध्ये एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो कोलकात्यातील हावडा ब्रिजवर दिसत आहे. आता कार्तिकचा हा फोटो पाहून चाहते उत्साहित झाले आणि कॉमेंट सेक्शनमध्ये त्याला अनेक प्रश्न विचारू लागले आहेत. या फोटोमधील त्याची स्टाईल ही अनेकांना आवडली आहे.

हावडा ब्रिजवरून 'रूह बाबा'चा फोटो : कार्तिक आर्यननं हावडा ब्रिज, कोलकाता येथून वेगळ्या शैलीत फोटो शेअर केल्यानंतर तो चर्चेत आला आहे.' रूह बाबा'च्या हावडा ब्रिजवर उभा असून त्याच्यामागे टॅक्सी असल्याच्या दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यानं 'कोलकाता कसे आहात' असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हा फोटो शेअर होताच एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "कॅप्शनमध्ये काय क्रिएटिव्हिटी दाखवली आहे." एका यूजरनं लिहिले, "हॅलो रूह बाबा', तुझा फोटो खूप सुंदर आहे." आणखी एकानं लिहिलं "तू मंजुलिकाला घ्यायला आला आहेस का?" याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्युल पूर्ण झाले : कार्तिक आर्यननं नुकतेच 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केले आहे आणि आता तो उर्वरित शूटिंग करण्यात व्यग्र आहे. 'भूल भुलैया 3'चे शूटिंग महिनाभरापूर्वी सुरू झाल्याची घोषणा करण्यात आली होती. हा बहुप्रतीक्षित चित्रपट हॉरर-कॉमेडी 'भूल-भुलैया' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर तृप्ती दिमरी, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि राजपाल यादव यांच्याही विशेष भूमिका आहेत. या रोमांचक सीक्वेलमध्ये कार्तिक आर्यन' रुह बाबा' म्हणून तर विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत परतत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट 2024च्या दिवाळी मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. नॅशनल सिबलिंग डेच्या प्रसंगी जाणून घ्या बॉलिवूडमधील काही सुंदर भावंडाच्या जोडीबद्दल - Siblings Day 2024
  2. वरुण धवन आणि तापसी पन्नू यांनी सांगितलं त्याच्या आयुष्यातील भावंडाचं महत्त्व - National Siblings Day
  3. जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा स्टारर 'जोकर 2'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Joker 2 trailer out

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.