हैदराबाद Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : चंदीगड विमानतळावर बॉलिवूड क्वीन कंगना राणावतला एका सीआयएसएफ जवान महिलेनं कानाखाली मारल्याची घटना घडल्यानं देशभरात खळबळ उडाली. सुरक्षा तपासणीनंतर कंगना गुरुवारी चंदीगड विमानतळावर पोहोचली. यावेळी एका CISF महिला जवानानं तिला कानाखाली मारुन शिवीगाळ केली. कंगनाला कानाखाली मारल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. कुलविंदर कौर असं कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाचं नाव आहे. कुलविंदर कौर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून तिला निलंबित करण्यात आलं आहे.
शेतकरी आंदोलक नेत्याची बहीण आहे कुलविंदर कौर : अभिनेत्री कंगना राणावतला कानाखाली मारणारी कुलविंदर कौर ही पंजाबमधील कपूरथला इथली रहिवासी आहे. कुलविंदर कौर आणि तिचा पती हे दोघंही सीआयएसएफमध्ये सेवा बजावत आहेत. कुलविंदर कौर सध्या चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा दलात सेवा बजावत आहे. कुलविंदर कौर मागील 15 वर्षापासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत आहे. 35 वर्षीय कुलविंदर कौर हिनं कंगणाला शेतकरी आंदोलनावरुन कानाखाली मारल्याची प्राथमिक माहिती पुढं आली आहे. कुलविंदर कौर हिचा भाऊ शेतकरी आंदोलनाचा नेता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंगनाला कानाखाली मारल्यानंतर महिला जवान निलंबित : अभिनेत्री कंगना राणावतला कानाखाली मारल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं कुलविंदर कौर हिला निलंबित केलं आहे. कुलविंदर कौर हिच्या विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. कुलविंदर कौर हिचा कंगनाला शिविगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे.
पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी, कंगनाचा आरोप : भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत हिला कानाखाली मारल्याच्या घटनेबाबत तिनं समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करुन सांगितलं. पंबाजमध्ये दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचं कंगनानं या व्हिडिओत नमूद केलं आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. गुरुवारी मी सुरक्षा तपासणीतून पुढं जात असताना एक महिला शिपाई माझ्यासमोर आली. त्यावेळी तिनं मला कानाखाली मारली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्यानं तिनं मला कानाखाली लगावल्याचं तिनं सांगितलं, असंही कंगनानं या व्हिडिओत स्पष्ट केलं.
हेही वाचा :