ETV Bharat / entertainment

बॉक्स ऑफिसवर 'किंग' विरुद्ध 'लव्ह अँड वॉर', 19 वर्षांनंतर शाहरुख आणि रणबीरमध्ये होईल संघर्ष - SRK and Ranbir Kapoor - SRK AND RANBIR KAPOOR

King vs Love and War at Box Office Big Clash : शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाची डेट आता व्हायरल झाली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूर आपल्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटातून शाहरुख खानला टक्कर देताना दिसेल.

King vs Love and War at Box Office Big Clash
बॉक्स ऑफिस बिग क्लॅश 'किंग ' विरुद्ध 'लव्ह अँड वॉर' (शाहरुख खान आणि रणबीर कपूर (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 6:02 PM IST

मुंबई King vs Love and War Big Clash : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान स्टारर 'किंग' चित्रपट खूप चर्चेत आहे. 'किंग खान'च्या रिलीज डेटची वाट चाहते आतुरतेनं पाहात आहेत. शाहरुखनं 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हिट दिल्यानंतर आता तो त्याच्या आगामी चित्रपटच्या तयारीत आहे. शाहरुख खाननं या तीन चित्रपटांमधून बॉक्स ऑफिसवर 2500 कोटींहून अधिक कमाई केली होती. शाहरुख चालू वर्षात एकाही चित्रपटात दिसत नाही. आता 'किंग' या चित्रपटाची रिलीज डेट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान अभिनीत 'किंग' चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'किंग'बद्दल मोठी माहिती समोर : या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. 2026 च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही. 'किंग' चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रविचंदर देणार आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान 'जवान' चित्रपटाच्या संगीतानं खूप प्रभावित झाला होता. त्यामुळे अनिरुद्धला या चित्रपटासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सुजॉय घोषच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'किंग' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. रेड चिली एंटरटेनमेंट या चित्रपटाची निर्मिती करत आहे. शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख 2024 च्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार असल्याचं आता समजत आहे.

'किंग'ची स्टारकास्ट : शाहरुखनं काही दिवसापूर्वी किंग चित्रपटामधील काही अ‍ॅक्शन सीन्स लंडनला शूट केले होते. यावेळी त्याची मुलगी सुहाना खान देखील त्याच्याबरोबर होती. दरम्यान 'किंग' या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटामध्ये 'मुंज्या' फेम अभिनेता अभय वर्मा, फहिम फाजली आणि इतर कलाकार दिसणार आहेत. अभय वर्मा हा पहिल्यांदाच 'किंग खान'बरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

शाहरुख खान आणि रणबीरची होईल टक्कर : शाहरुख खान आणि रणबीर कपूर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येत आहेत. शाहरुख खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'किंग' आणि रणबीर कपूरचा 'लव्ह अँड वॉर'मध्ये बॉक्स ऑफिसवर मोठी लढत होणार आहे. दोन्ही चित्रपटांच्या तात्पुरत्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हे दोन्ही चित्रपट 2026 च्या ईदच्या मुहूर्तावर रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होतील. आता यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. 2007 मध्ये रणबीर कपूरचा डेब्यू चित्रपट 'सावरिया' आणि शाहरुख खानचा चित्रपट 'ओम शांती ओम' दिवाळीच्या मुहूर्तावर एकाचवेळी प्रदर्शित झाले होते. दरम्यान दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 'किंग' हा क्राईम ड्रामा चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटाची रिलीजची तारीख ख्रिसमस 2025 वरून ईद 2026 वर हलवली आहे. संजय लीला भन्साळीचा चित्रपट 19 वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर 'किंग खान'च्या आणखी एका चित्रपटाशी टक्कर देणार आहे. बॉक्स ऑफिसच्या या पहिल्या लढाईत शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'नं 'सावरिया'ला पराजित केलं होतं.

हेही वाचा :

  1. रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date
  2. शाहरुख खाननं दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग नवजात कन्येला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - SHAH RUKH Meets DEEPIKAS BABY GIRL
  3. कंगना रणौतनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर साधला निशाणा, काय म्हटलं जाणून घ्या... - Kangana Ranaut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.