मुंबई -Shah Rukh Khan : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान 77व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये पोहोचला आहे. या मोठ्या मंचावर किंग खानला कधी सन्मानित केलं जाईल याची सर्वजण वाट पाहात असतानाच, या चित्रपट महोत्सवातील शाहरुख खानचे काही फोटो समोर आले आहेत. शनिवारी दुपारी लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलनं शाहरुख खानचे पोस्टर शेअर केले, यामध्ये किंग खाननं स्टायलिश लूकनं चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पोस्टरमध्ये शाहरुख खान ब्लॅक ब्लेझर आणि मॅचिंग ट्राउझर्समध्ये खूप सुंदर दिसत आहे.
चाहत्यांनी शाहरुखचं केलं कौतुक : शाहरुखचं हे पोस्टर शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी कमेंट विभागात कौतुकाचा वर्षाव केला. एका चाहत्यानं यावर लिहिलं, "भारतीय चित्रपटसृष्टीचा किंग" दुसऱ्या एकानं लिहिलं, "शाहरुख खान एक भावना आहे, त्याला बॉलिवूडनं प्रसिद्ध केलं नाही, त्यानं बॉलिवूडला प्रसिद्ध केलं आहे." शाहरुख खानला आज लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये करिअर अचिव्हमेंट अवॉर्ड - परडो अल्ला कॅरिएरानं सन्मानित केलं जाणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार दिला जात आहे. त्यानं आपल्या करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपट केले आहेत. पियाझा ग्रांडे येथे संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा होणार आहे. याशिवाय खानच्या कारकिर्दीतील एक खास चित्रपट 'देवदास' फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाईल.
'किंग'मध्ये शाहरुख खान दिसेल : शाहरुखच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर तीन ब्लॉकबस्टर चित्रपट ' पठाण', 'जवान' आणि 'डंकी'नं खूप कमाई केली होती. 'पठाण' जानेवारी 2023 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांनी 'किंग खान'बरोबर काम केलं होतं. दुसरीकडे, 'जवान' सप्टेंबर 2023 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोण, नयनतारा, रिद्धी डोगरा आणि विजय सेतुपती यांच्या विशेष भूमिका होत्या. दोन मेगा रिलीजनंतर, शाहरुख खान डिसेंबर 2023 मध्ये 'डंकी'सह थिएटरमध्ये धमाल करण्यासाठी परतला. दिग्दर्शक राजकुमार हिरानीबरोबरचा पहिला चित्रपट असून यात त्याच्याबरोबर विकी कौशल आणि तापसी पन्नू यांनी काम केलय. यानंतर शाहरुख लवकरच 'किंग'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- काजोलनं 21 वर्षात शाहरुख खानबरोबर केलेले 6 हिट चित्रपट, नक्की पाहा - 6 superhit movies
- शाहरुख खान विदेशात मुलासमेवत सुट्टीचा घेतोय आनंद, किंग खानला अचानक पाहताच चाहत्यांना सुखद धक्का - SHAH RUKH KHAN NEWS
- 'किंग ऑफ रोमान्स' शाहरुख खानवर चित्रित सोनू निगमची टॉप 5 रोमँटिक हिट गाणी - happy birthday SONU NIGAM