ETV Bharat / entertainment

कियारा अडवाणीनं फरहान अख्तरच्या 'डॉन 3'साठी घेतली तब्बल 'इतकी' फी - कियारा आडवाणी

Kiara Advani Don 3 Fees : अभिनेत्री कियारा अडवाणीनं 'डॉन 3'मध्ये काम करण्यासाठी मोठी रक्कम घेतली आहे. आतापर्यंत तिनं कोणत्याही चित्रपटासाठी एवढी फी घेतलेली नाही.

Kiara Advani Don 3 Fees
कियारा अडवाणी डॉन 3ची फी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 5, 2024, 4:06 PM IST

मुंबई - Kiara Advani Don 3 Fees : अभिनेता रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी स्टारर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट 'डॉन 3' हा सध्या चर्चेत आहे. शाहरुख खाननं माघार घेतल्यानंतर रणवीर सिंगला या चित्रपटासाठी संधी मिळाली आहे. दरम्यान 'डॉन 3' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणून कियारा अडवाणीची निवड करण्यात आली आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी डॉन फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागासाठी जोरदार तयारी करत आहेत. नुकतेच 'डॉन 3' मध्ये कियारा अडवाणीच्या नावाची घोषणा करण्यात आली, यानंतर तिचे चाहते या बातमीमुळे खूप खुश झाले. आता कियारानं 'डॉन 3'साठी किती रक्कम निर्मात्यांकडून घेतली याबद्दल खुलासा झाला आहे.

कियारानं 'डॉन 3'साठी किती रक्कम घेतली : 'डॉन 3'मध्ये कियारा 'जंगली बिल्ली'च्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी या चित्रपटात क्रिती सेनॉनला घेणार असल्याची चर्चा होती. कियारा आणि रणवीर सिंग 'डॉन 3'साठी स्क्रीन टेस्ट पास केली. यानंतर या दोघांनाही चित्रपटात फायनल करण्यात आलं. याशिवाय यानंतर 'डॉन 3'चा एक टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरमध्ये रणवीर खूप धमाकेदार दिसला. टीझरमधील त्याचा अंदाज अनेकांना आवडला होता. कियारा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'डॉन 3' या चित्रपटासाठी कियारानं मोठी रक्कम घेतली असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कियारानं 'डॉन 3' चित्रपटासाठी 13 कोटी रुपये घेतले आहेत. आतापर्यत कियारानं कुठल्याचं चित्रपटासाठी इतकी फी घेतली नव्हती. कियारानं 'वॉर 2'साठी 50 टक्के कमी फी घेतली आहे.

'डॉन 3' कधी रिलीज होणार? : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राचे चाहते 'डॉन 3' चित्रपटात रणवीर आणि कियारा एकत्रित येत असल्यामुळे रोमांचित आहेत. शाहरुख आणि प्रियांकाचा 'डॉन 2' चित्रपट 23 डिसेंबर, 2011मध्ये रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील गाणी त्यावेळी प्रचंड हिट झाली होती. आता रणवीर आणि कियारा स्टारर 'डॉन 3' 2025 रोजी रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग देखील 2025 मध्ये सुरू होत आहे.

हेही वाचा :

  1. करीना, तब्बू, क्रिती स्टारर 'क्रू' चित्रपटातील 'नैना' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिज्मबद्दल कंगना रनौतच्या दाव्यावर इमरान हाश्मीनं केला खुलासा
  3. एसएस राजामौलीच्या आगामी 'जंगल अ‍ॅडव्हेंचर' चित्रपटात महेश बाबूचे 8 वेगळे लूक्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.