मुंबई - Khel Khel Mein Song Duur Na Karin : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या 'सरफिरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत. दरम्यान, 'खिलाडी कुमारचा' पुढचा चित्रपट 'खेल खेल में' आता चर्चेत आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याला त्याच्या या आगामी चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. आज या चित्रपटातील दुसरं गाणे 'दूर ना करीं' रिलीज झालंय. यामध्ये तो वाणी कपूरबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. हे गाणं विशाल मिश्रा आणि झाहरा एस खान यांनी गायलं आहे. या गाण्याचे बोल गीतकार कुमार यांनी लिहिले आहेत. तनिष्क बागचीनं हे गाणं संगीतबद्ध केलय.
'खेल खेल में'मधील दुसरे गाणं रिलीज : या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त तापसी पन्नू, वाणी कपूर आणि फरदीन खान, एमी विर्क, आदित्य सील, प्रज्ञा जैस्वाल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज आणि वाकाओ फिल्म्स करत आहेत. आता अनेक चाहते 'खेल खेल में' चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहात आहेत. 2 ऑगस्ट रोजी मुंबईत एका कार्यक्रमात या चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च होणार आहे. 'खेल खेल में'च्या थिएटर ट्रेलरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं यूए प्रमाणपत्र दिलं आहे. आता अक्षयचे चाहते या चित्रपटाकडून खूप आशा लावून बसले आहेत. यामध्ये अक्षयचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमारचं वर्कफ्रंट : याच महिन्यात अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाल्यानंतर याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. रुपेरी पडद्यावर 'कल्की 2898 एडी', 'किल' आणि अमेरिकन चित्रपट 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन'बरोबर 'सरफिरा' स्पर्धा करत आहे. कल्की 2898 एडी', 'किल' आणि 'डेडपूल अॅन्ड वूल्वरिन' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत. आता 'खेल खेल में'मधून अक्षय कुमारचं नशिब कुठे जातं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान अक्षयच्या आगमी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'वेलकम 3', 'स्कायफोर्स', 'जॉली एलएलबी 3', 'हाउसफुल 5', 'हेरा फेरी 3' आणि 'राउडी राठौर 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :