मुंबई - Kavita Kaushik : जोशीमठ-बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळली आहे आता यामुळे 'एफआयआर शो' फेम टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये अडकली आहेत. ती आणि तिचा पती रोनित बिस्वासबरोबर आर्मी कॅम्पमध्ये राहत आहे. कवितानं सांगितलं की, "डेहराडून ते बद्रीनाथ या प्रवासाचा तिनं खूप आनंद लुटला. त्यानंतर भगवान बद्रीनाथचे दर्शन तिनं केलं, मात्र तिथून परत येत असताना दरड कोसळली. चार दिवसांपासून ती इथे अडकून आहे. कविता कौशिक 5 जुलै रोजी आपल्या पतीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बद्रीनाथला गेली होती.
दरड कोसळल्यामुळे टीव्ही अभिनेत्री अडचणीत : पतीशिवाय तिचा चुलत भाऊही तिच्याबरोबर आहे. याबद्दल बोलताना एका मुलाखती दरम्यान तिनं सांगितलं की, "चार दिवसांपासून तिथे अडकल्यामुळे मी काळजीत आहे. मला काही महत्त्वाच्या कामासाठी काशीपूरला जायचे होते. आता यामुळे मी अडचणीत सापडली आहे. मला आशा आहे की मी इथून लवकरच निघेल, कारण बराच काळ इथे राहून झाला आहे." यानंतर तिनं पुढं सांगितलं की, "महामार्गावर हजाराहून अधिक गाड्या अडकल्या आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी पोलीस आणि भारतीय सैनिक खूप प्रयत्न करत आहेत. एक स्लाइड साफ केल्यानंतर, दुसरी स्लाइड साफ करावी लागते, त्यामुळे अधिक वेळ जात आहे. हा त्याच्यासाठी देखील कठीण वेळ आहे."
कविता कौशिकन केल्या भावना व्यक्त : यानंतर तिनं पुढं सांगितलं "हे खूप भीतीदायक आहे पण मी उत्तराखंड पोलीस आणि भारतीय सैनिकांना सलाम करते की, जे लोकांना शक्य तितकी मदत करत असून त्यांची काळजी घेत आहेत. कविता कौशिकनं 'एफआयआर'मध्ये चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका खूप गाजली होती. या मालिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ती 'कुटुम्ब', 'मिंदो तसीलदारानी', 'सीआयडी' 'कहानी घर घर की' आणि 'वधाईयाँ जी वधाईयाँ', 'तेरा छलावा' सारख्या टीव्ही शोमध्ये ती दिसली आहे. तिनं 'नच बलिये 3', 'बिग बॉस 14' आणि इतर अनेक रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे.