मुंबई - Katrina Kaif : अभिनेता करण जोहर निर्मित 'बॅड न्यूज' या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर 28 जून रोजी प्रदर्शित झाला. विकी कौशल, पंजाबी अभिनेता एमी वर्क आणि 'ॲनिमल' फेम अभिनेत्री तृप्ती दिमरी 'बॅड न्यूज' मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आता चाहत्यांपासून तर सेलिब्रिटींना खूप आवडत आहे. ट्रेलरमध्ये विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचाही रंजक उल्लेख केला आहे. आता कतरिना कैफनं 'बॅड न्यूज'च्या ट्रेलरवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. कतरिनानं इन्स्टास्टोरीवर 'बॅड न्यूज 'चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आणि लिहिलं, 'मी प्रतीक्षा करू शकत नाही, अभिनंदन, अमृत पाल बिंद्रा, आनंद तिवारी आणि करण जोहर.'
'बॅड न्यूज' चित्रपटाबद्दल : 'बॅड न्यूज' या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केलंय. 28 जून रोजी रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये नेहा धुपियाची सुंदर झलक देखील पाहायला मिळाली आहे. 'बॅड न्यूज'च्या ट्रेलरमध्ये तृप्ती डिमरी गरोदर असून तिच्या बाळाचा वडील विकी कौशलच नाही तर एमी वर्क देखील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. गर्भधारणेचा अहवाल आल्यानंतर बाळामध्ये विकी आणि एमीचा डीएनए आढळून येतो. आता चित्रपटाचा ट्विस्ट म्हणजे तृप्ती आपल्या मुलाला कुठल्या वडिलांचं नाव देणार हे या चित्रपटाची कहाणी असणार आहे. रिलीज झालेल्या ट्रेलरवर चाहते आपली प्रतिक्रिया देऊन विकीच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहेत.
विकी कौशल आणि तृप्ती दिमरीचं वर्कफ्रंट: 'बॅड न्यूज' हा चित्रपट 19 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाची कहाणी इशिता मोइत्रा आणि तरुण डुडेजा यांनी मिळून लिहिली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार, अशी अपेक्षा या चित्रपटाचे निर्माते करत आहेत. दरम्यान विकी कौशल आणि तृप्ती दिमरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढे 'लव्ह ॲन्ड वॉर' या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो 'छावा', 'लुका छुपी 2' आणि 'तख्त' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे तृप्ती ही 'भूल भुलैया 3', 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' आणि 'धडक 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :