मुंबई - Salman Khan Sikandar : सलमान खान अलिकडे त्याच्या आगामी 'सिकंदर' या अॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. यंदाच्या ईदला त्यानं 'सिकंदर' चित्रपटाची घोषणा केली होती. पुढच्या वर्षी 2025च्या ईदला सलमान खान आपल्या चाहत्यांना या नव्या चित्रपटाची भेट पर्वणी म्हणून देणार आहे. या चित्रपटाच्या लेटेस्ट अपडेटमध्ये अलिकडेच दक्षिणेकडील चित्रपटांची ब्यूटी रश्मिका मंदान्ना यात भूमिका करणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता अभिनेता सत्यराजने सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'बाहुबली' या चित्रपटात सत्यराजनं कट्टप्पाची भूमिका साकारली होती.
हाती आलेल्या माहितीनुसार सत्यराजनं स्वतः सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटात सामील झाल्याची पुष्टी केली आहे. 'सिकंदर' या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सत्यराजच्या आधी 'सिकंदर' या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी अभिनेता अरविंद स्वामी, प्रकाश राज आणि कार्तिकेय यांची नावं समोर आली होती. आता या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत कोण दिसणार आणि सलमान खानबरोबर कोण कोणते कलाकार चित्रपटात झळकणार याची प्रतीक्षा सलमान खानचे चाहते करत आहेत.
आमिर खानबरोबर 'गजनी' हा चित्रपट करणारा दिग्दर्शक एआर मुरुगोदास 'सिकंदर' चित्रपट बनवत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवाला हा सलमान खानचा खास मित्र आहे. चालू वर्ष 2024 मध्ये सलमान खान एकाही चित्रपटात दिसणार नाही. यापूर्वी सलमान खान 12 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता.
'सिकंदर' हा अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे. त्यामुळे यात तडाखेबंद अॅक्शन पाहायला मिळणार हे निश्चित आहे. या चित्रपटासाठी सलमान स्वतः बॉडी डबल न वापरता अॅक्शन करणार आहे. यासाठी सलमान खान मोठ्या प्रमाणावर जिम करत आहे. त्यानं त्याच्या कामाचा दिनक्रम बदलला असून चित्रपटाची मुख्य नायिका रश्मिका मंदान्ना हिलाही कठोर परिश्रम करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि हिंदी भाषेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं गेलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग मुंबई नंतर हैदराबादला होणार असून 'सिकंदर' चित्रपटाची संपूर्ण टीम त्यानंतर परदेशात रवाना होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदला प्रदर्शित होणार असून 2025 मध्ये ईद 31 मार्च रोजी असेल.
हेही वाचा -