ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कार्तिक आर्यन आईसह लावणार हजेरी, प्रोमो रिलीज - kartik aaryan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 1:38 PM IST

Kartik aaryan :'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा फिनाले एपिसोड आता चर्चेत आहे. आता या शोचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे, यामध्ये कार्तिक आर्यन आणि त्याची आई माला तिवारी एकत्र दिसत आहे.

Kartik aaryan
कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन (IMAGE- IANS))

मुंबई - Kartik aaryan : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा फिनाले एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटासाठी चर्चेत असणार कार्तिक आर्यन या शोचा एक भाग असणार आहे. दरम्यान, कार्तिक त्याच्या आईबरोबर शोमध्ये सहभागी होणार आहे, आता या शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये त्याची आई कार्तिकबद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर करताना दिसत आहेत. प्रोमोत कार्तिक आईसमोर खूपच घाबरलेला दिसत आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा फिनाले एपिसोड खूप मनोरंजक असणार आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो रिलीज : प्रोमोमध्ये कार्तिक आर्यन म्हणतो, "मी आजच्यासारखा नर्व्हस कधीच नव्हतो." यानंतर कपिल शर्मा हसत हसत म्हणतो की, "तुझी आई काही सांगणार आहे का?" यावर कार्तिकची आई म्हणते, "मी जे बोलेन ते खरे बोलेन." तसेच कपिल म्हणतो की, "कार्तिकच्या वडीलांना भिती वाट आहे की, तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगणार." कपिल कार्तिकच्या आईला विचारतो, "कार्तिक जिद्दी आहे का?' यावर त्याची आई म्हणते, "तो खूप हट्टी आहे." पुढं कपिल त्याच्या आईला विचारतो, "कार्तिक जास्त खर्च करतो की कमी?" त्याची आई म्हणते, "जास्त करतो." यानंतर कपिल म्हणतो की, "तो इंजिनिअर आहे." यावर त्याची आई म्हणते, "त्याची इंजिनिअरिंग मारून पीटून झाली आहे." यानंतर कार्तिक हसून आईला म्हणतो, "काहीतरी सकारात्मक बोल."

नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल : दरम्यान प्रोममध्ये पुढं कार्तिक लग्नासाठी एका मुलीला 'फायनल' करताना दिसतो. ती मुलगी कार्तिकला म्हणते, "मी तुझा फोन कधीही तपासणार नाही." यावर कार्तिक उत्तर देतो, "डन." तसेच कार्तिकच्या आईला कार्तिकसाठी डॉक्टर मुलगी पाहिजे असल्याचं देखील यावेळी उघड होते. यानंतर सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा आपापल्या स्टाइलमध्ये लोकांना हसवताना दिसतात. कृष्णा अभिषेक शाहरुख खानच्या 'पठाण'च्या अवतारात यावेळी दिसतो. शोमध्ये तिघांची स्टाईल पाहून कार्तिकला हसू फुटते. हा मजेदार एपिसोड या शनिवारी रात्री 8 वाजता नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा :

  1. सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN
  2. बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT
  3. 'चंदू चॅम्पियन'नं कपिल देवला केलं भावूक, म्हणाले 'चित्रपट चुकवू नका' - Kartik Aaryans Chandu Champion

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.