ETV Bharat / entertainment

'मजा संपली काम सुरू', कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू - bhool bhulaiyaa 3 - BHOOL BHULAIYAA 3

Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 : कार्तिक आर्यन अभिनीत 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं दुसरे शेड्यूल सुरू झाले आहे. कार्तिकनं याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3
कार्तिक आर्यन भूल भुलैया 3
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 6:09 PM IST

Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Kartik Aaryan Bhool Bhulaiyaa 3 : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3 ' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक पुन्हा एकदा 'रूह बाबा'च्या भूमिकेत आपली जादू प्रेक्षकांवर चालवताना दिसणार आहे. अलीकडेच त्यानं मुंबईत चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं होतं. कार्तिक, विद्या बालन, तृप्ती दिमरीनं 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं आहे. दरम्यान सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं कार्तिक आर्यनला फुटबॉलचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडलं होतं. यानंतर तो जर्मनीला गेला होता. आज 1 एप्रिल रोजी, कार्तिक आर्यननं त्याच्या चाहत्यांना 'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल नवीन अपडेट दिली आहे.

कार्तिक आर्यन शेअर केली पोस्ट : कार्तिकनं चित्रपटाचं दुसरे शेड्यूल सुरू केलं आहे. सोशल मीडियावर त्यानं स्वतःचा एक फोटो शेअर केला असून मजेशीर सहल संपली आहे आणि काम सुरू झालं असल्याचं सांगितलं आहे. कार्तिक फोटोत कारमध्ये बसलेला दिसत आहे. या फोटोमध्ये त्यानं आकाशी रंगाचा शर्ट घातला आहे आणि तो चित्रपटाची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. अनीस बज्मी 'भूल भुलैया 3' चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'मधील 'भाभी 2' म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती दिमरी मुख्य भूमिकेत असणार आहे. 'भूल भुलैया 3' चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.

वर्कफ्रंट : याआधी कार्तिक हा 'भूल भुलैया 2'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर चांगलीच कमाई केली होती. दरम्यान कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी' सत्य प्रेम की कथा' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. 'भूल भुलैया 3' व्यतिरिक्त कार्तिक 14 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात दिसणार आहे. कबीर खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटात त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, राजपाल यादव, विजय राज, पलक लालवानी आणि इतर कलाकार दिसणार आहेत. याशिवाय पुढं तो 'आशिकी 3' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie
  2. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts
  3. अभिनेत्री आलिया भट्टनं करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपटाचा दिला रिव्ह्यू , केली पोस्ट शेअर - alia bhatt

Last Updated : Apr 2, 2024, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.