ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'चं शीर्षक बदललं ; जाणून घ्या नवं नाव... - कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी

Aashiqui 3 gets titled :अभिनेता कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी अभिनीत 'आशिकी 3'चं शीर्षक बदलण्यात आलं आहे. आता लवकरच या चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 2:40 PM IST

मुंबई - Aashiqui 3 gets titled : अभिनेता कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर चित्रपट 'आशिकी 3'बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी 2023च्या शेवटी, तारा सुतारियाला बाजूला करून तृप्ती दिमरीनं या चित्रपटात प्रवेश केला आहे. अभिनेता रणबीर कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि बॉबी देओल स्टारर 'अ‍ॅनिमल' या मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपटातून तृप्ती दिमरीला खूप प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला अनेक चित्रपटाचे ऑफर्स येऊ लागले आहेत. तृप्तीची लोकप्रियता लक्षात घेऊन 'आशिकी 3' या चित्रपटासाठी तिची निवड करण्यात आली आहे. दरम्यान 'आशिकी 3' संदर्भात नवीन अपडेट म्हणजे चित्रपटाचे नाव बदलण्याची बातमी समोर आली आहे. आता या चित्रपटाचं शीर्षक दुसरे असल्याचं म्हटलं जात आहे.

आता चित्रपटाचे नवीन नाव काय असेल? : मिळालेल्या माहितीनुसार, 'आशिकी 3'ला 'तू है आशिकी' या नावाने ओळखला जाईल. निर्मात्यांनी अद्याप या नावाला दुजोरा दिला नसला तरी ही बातमी सोशल मीडियावर वेगानं पसरली आहे. टी-सीरीजचे मालक आणि 'आशिकी 3' चित्रपटाचे निर्माता भूषण कुमार यांनी तृप्तीला 'आशिकी 3' चित्रपटासाठी साइन केलं आहे. 'अनुराग बसू' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 'ॲनिमल' या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर तृप्ती दिमरी खूप लोकप्रिय झाली, अनेकांना तिचे काम आवडले. आता तृप्तीला 'भाभी 2' या नावानं ओळखले जाते.

'तू है आशिकी' शूटिंग कधी सुरू होणार? : मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आणि तृप्तीचा रोमँटिक चित्रपट 'तू है आशिकी'चं शूटिंग मार्चमध्ये सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'भूल भुलैया 2' या हिट चित्रपटानंतर कार्तिकचा हा दुसरा फ्रेंचाइजी चित्रपट आहे. 'आशिकी 3' चित्रपटापूर्वी कार्तिक आर्यन त्याच्या स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन'साठी चर्चेत आहे, जो जून 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केलंय. 'चंदू चॅम्पियन' चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, पलक लालवानी, गोस्वामी सोनिया, विजय राज, भुवन अरोरा आणि इतर कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2' रिलीजपूर्वी 'पुष्पा 3'ची बातमी कन्फर्म; अल्लू अर्जुन केला खुलासा
  2. मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्रला बसला धक्का
  3. आमिर खान, किरण राव दिल्लीत 'लापता लेडीज'च्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.