मुंबई Kartik-Sara : अभिनेत्री अनन्या पांडे स्टारर वेब सीरीज 'कॉल मी बे' 6 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान मुंबईत 4 ऑगस्ट रोजी बुधवारी या वेब सीरीजचा प्रीमियर इव्हेंट पार पडला. या कार्यक्रमात काही खास सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. 'कॉल मी बे'च्या प्रीमियर इव्हेंटमध्ये कार्तिक आर्यनबद्दल जास्त चर्चा झाली. या कार्यक्रमात कार्तिकनं ग्रे स्वेटशर्ट आणि जीन्स परिधान केली होती. या इव्हेंटमध्ये, जेव्हा त्यानं त्याची कथित एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानला पाहिलं, तेव्हा त्यानं तिला मिठी मारली. आता या इव्हेंटमधील त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे.
कार्तिकनं साराला मारली मिठी : या व्हिडिओमध्ये सारा आणि कार्तिक व्यतिरिक्त अभिनेत्री अनन्या पांडे देखील दिसत आहे. कार्तिकनं कथित एक्स गर्लफ्रेंड साराला पापाराझी आणि अनन्यासमोर मिठी मारली, तेव्हा मागे उभी असलेल्या अनन्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. व्हिडिओमध्ये कार्तिक आणि साराला एकत्र पाहिल्यानंतर अनन्या ही अस्वस्थ होताना दिसत आहे. आता या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या इव्हेंटमध्ये करण जोहर, कार्तिक आर्यन, सारा अली खान, सुहाना खान, अगस्त्य नंदा, अनन्या पांडे, इब्राहिम अली खान, शनाया कपूर, विहान सामत, राधिका मदन आणि इतर बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते.
सारा आणि कार्तिकला एकत्र पाहून अनन्या झाली अस्वस्थ : इव्हेंटमध्ये सारा आणि कार्तिक यांनी मैत्रीपूर्ण मिठी मारली होती. दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, "अनन्याला टेन्शन आलं आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अनन्याचा, सारा आणि कार्तिकला एकत्र पाहून का वेगळा चेहरा झाला आहे." मिळालेल्या माहितीनुसार कार्तिक 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान साराला डेट करत होता. जेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं, तेव्हा त्यानं अनन्या पांडेला काही काळ डेट केलं होतं. दरम्यान करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी 'कॉल मी बे'ची निर्मिती केली आहे.
हेही वाचा :