ETV Bharat / entertainment

करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनचे 50 टक्के शेअर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना विकले - KARAN JOHAR

करण जोहरनं धर्मा प्रोडक्शनचे 50 टक्के शेअर्स सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांना विकले आहेत. आता एक निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

Karan Johar
करण जोहर (करण जोहर-अदार पूनावाला (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 21, 2024, 5:13 PM IST

मुंबई: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शननं करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमधील 50 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शन्स आणि धर्मा प्रॉडक्शननं जागतिक प्रेक्षकांसाठी चांगला आशय पोहोचवण्यासाठी हातमिळवणी केली आहे. धर्मा प्रोडक्शननं 21 ऑक्टोबर रोजी अधिकृत निवेदनाद्वारे याबद्दल पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू होती की, करण जोहरचं धर्मा प्रॉडक्शन हाऊस तोट्यात आहे. करण मुकेश अंबानीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला आपला काही हिस्सा विकण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. आता अदार पूनावालानं करणच्या कंपनीचे पन्नास टक्के शेअर्स खरेदी केले आहेत.

धर्मा प्रॉडक्शनमधील 50 टक्के हिस्सा अदार पूनावालानं घेतला विकत : सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी, करण जोहरचा धर्मा आणि अदार पूनावालाच्या सेरेन एंटरटेनमेंटनं एक संयुक्त निवेदन जारी केले, यामध्ये असं लिहिलं आहे की, 'अदार पूनावाला यांच्या नेतृत्वाखालील सेरेन प्रॉडक्शननं आज जाहीर केलं की, त्यांनी करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या भारतातील आघाडीच्या बॅनरशी संयुक्त उपक्रमावर स्वाक्षरी केली आहे. सेरेन प्रोडक्शन हाऊसनं धर्माटिक एंटरटेनमेंट ('धर्मा') मध्ये 1,000 कोटीचा गुंतवण्याचा बंधनकारक करार केला. 'या गुंतवणुकीद्वारे सेरेन प्रॉडक्शन धर्मामध्ये 50 टक्के हिस्सेदारी ठेवणार आहे. याशिवाय उर्वरित 50 टक्के मालकी करण जोहरकडे राहिल.

अदार पूनावालाचं विधान : कार्यकारी अध्यक्ष या नात्यानं, करण जोहर कंपनीचे नेतृत्व करेल, तर अपूर्व मेहता, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या भूमिकेत असेल, धोरणात्मक दिशानिर्देश आणि संस्थेच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी करणबरोबर अपूर्व देखील काम करेल. दरम्यान या कंपनीचा हिस्सा विकत घेतल्याबद्दल बोलताना अदार पूनावाला यांनी म्हटलं, "मित्र करण जोहरबरोबर प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊसमध्ये भागीदारी करण्याची संधी मिळाल्यानं मी आनंदी आहे. आम्हाला आशा आहे की, येत्या काही वर्षांत धर्माची आणखी प्रगती होईल आणि आम्ही यापेक्षा अधिक उंची गाठू."

करण जोहरनं व्यक्त केल्या भावना : या भागीदारीबद्दल भाष्य करताना, धर्माचे कार्यकारी अध्यक्ष, करण जोहरनं म्हटलं, "माझ्या वडिलांचे असे चित्रपट बनवण्याचे स्वप्न होते, जे लोकांवर प्रभाव टाकतील आणि त्यांना काहीतरी शिकायला मिळेल. त्या दृष्टीचा विस्तार करण्यासाठी मी माझे करिअर समर्पित केले आहे. आज, जेव्हा आम्ही अदार, एका जवळचा मित्राबरोबर काम करत आहोत. धर्माचा वारसा नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ही भागीदारी स्टोरीटेलिंग स्ट्रेंथ आणि फॉरवर्ड थिंकिंग बिजनेस स्ट्रेटजीचा परफेक्ट मिक्चर असेल."

अपूर्व मेहता केलं भागीदारीवर भाष्य : धर्माचे सीईओ अपूर्व मेहता यांनी भागीदारीबद्दल म्हटलं, "गेल्या काही वर्षांत, मी धर्माला पॉवरहाऊसमध्ये बदलताना पाहिले आहे. अदारबरोबरची ही भागीदारी आमची दृष्टी साकार करते आणि एका नवीन युगाची सुरुवात करते, जिथे सिनेमा, स्ट्रीमिंग आणि जागतिक आशय एकत्र येतात. यामुळे भारतीय मनोरंजनाला चालना मिळेल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, ही गुंतवणूक आपल्याला एक मोठे सर्जनशील पाऊल पुढं टाकण्याची परवानगी देते." करणचे धर्मा प्रॉडक्शन दोन भागामध्ये वाटले गेले आहे.

हेही वाचा :

  1. करण जोहर म्हणाला 'मुर्ख', दिव्या कुमारला संताप अनावर !!
  2. मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी करण जोहर आणि राणी मुखर्जीनं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट - Karan Johar and Rani Mukerji
  3. करण जोहरनं ज्याबद्दल सांगितलं तो 'बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर' आजार काय आहे? - Body Dysmorphic Disorder

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.