मुंबई Bobby Deol First Look Out from Kanguva : अभिनेता रणबीर कपूर स्टारर ॲक्शन चित्रपट 'ॲनिमल'मध्ये खलनायकाची भूमिका साकारल्यानंतर बॉबी देओलचा चित्रपटसृष्टीत बोलबाला झाला. त्याला अनेक चित्रपटांची ऑफर्स हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीत मिळत आहेत. दरम्यान आज बॉबी देओलसाठी खूप खास दिवस आहे. तो आज त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे अनेक चाहते या विशेष प्रसंगी त्याला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता सनी देओलनं आपल्या छोट्या भावाचा सुंदर फोटो पोस्ट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बॉबी देओलनं दिली चाहत्यांना भेट : दरम्यान आज 27 जानेवारी रोजी बॉबीनं त्याच्या चाहत्याला पहाटे एक सुंदर भेट दिली आहे. बॉबीनं त्याच्या आगामी 'कंगुवा' चित्रपटातील त्याचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. 'कंगुवा' हा चित्रपट साऊथचा सुपरस्टार सूर्याचा चित्रपट आहे, ज्यामध्ये बॉबी देओल खलनायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामधील बॉबीचं फर्स्ट लूक हे पाहण्यासारखे आहेत. 'कंगुवा' चित्रपटातील बॉबी देओलच्या फर्स्ट लूकबद्दल बोलायचं झालं तर, त्याचा एक भितीदायक चेहरा या लूकमध्ये दाखविण्यात आला आहे. मोठे केस आणि उग्र डोळ्यांनी बॉबीचा हा लूक भयंकर आहे. बॉबीचा हा लूक बाहुबली चित्रपटातील कालिकेयशीही जुळणार आहे.
बॉबी देओलचं फर्स्ट लूक : 'कंगुवा'तील बॉबीचा फर्स्ट लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यानं शेअर केलेल्या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, 'हा लूक खूप भयानक आहे'. दुसरा एका यूजरनं लिहिलं, 'बॉबीची फर्स्ट लूक पोस्ट खूप छान आहे.'' आणखी एका युजरनं लिहिलं, ''खूप भयानक प्रतिमा आहे.'' 'कंगुवा' हा मूळ तमिळ भाषेतील ॲक्शन चित्रपट आहे, ज्याचं दिग्दर्शन शिवा यांनी केलंय. या चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सूर्या, बॉबी देओल, दिशा पटानी, जगपती बाबू, योगी बाबू यांसारख्या लोकप्रिय कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 2024मध्ये प्रदर्शित होणार असला तरी प्रदर्शनाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
हेही वाचा :