ETV Bharat / entertainment

महिला प्रतिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणत केली होती हेटाळणी - Kangana Ranaut - KANGANA RANAUT

मंडी लोकसभा जागेसाठी भाजपाच्या उमेदवार कंगना रणौतबद्दलच्या कथित वादग्रस्त पोस्टनंतर काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांच्यावर खूप टीका केली जात आहे. खरंतर उर्मिला मातोंडकर जेव्हा राजकारणात उतरली तेव्हा 2020 मध्ये कंगनाने तिला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं होतं. कंगनाच्या या मुलाखतीची आठवण तिला करुन द्यायचा प्रयत्न नेटिझन्सनी केला आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 1:38 PM IST

मुंबई - कंगना रणौत भाजपाच्या तिकीटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे. कंगना फटकळ आणि वादग्रस्त विधान करणारी म्हणूनही परिचीत आहे. 2020 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हटलं होतं. अलीकडे, कंगना महिलांच्या प्रतिष्ठेचा पुरस्कार करत असताना तिची ही जुनी कमेंट पुन्हा उफाळून वर आली आहे. तिनं सार्वजनिक भाषणात अपमानास्पद भाषेचा वापर केला होता.

कंगनाच्या मंडी लोकसभा जागेसाठी भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लगेचच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्यानंतर एका नव्या वादाला तोंड फुटलं होतं.

या पोस्टमध्ये कंगना रणौत तोकड्या कपड्यातील फोटोत दिसत होती आणि तिच्या बद्दल लिहिण्यात आलेली कमेंटही वादग्रस्त ठरली होती. त्यानंतर कंगना पलटवार करण्यासाठी मैदानात उतरली आणि आपण कशा महिला म्हणून समाजातील वेगवेगळ्या स्त्रीची रुपं पडद्यावर दाखवली त्याचा अभिमाननं उल्लेख केला होता. "प्रत्येक स्त्री तिच्या सन्मानास पात्र आहे," असं कंगनानं ठामपणे सांगितलं होतं.

सुप्रिया श्रीनातेने यांनी आपली पोस्ट सोशल मीडियावर हटवली आणि आपले अकाउंट कोणीतरी हॅक केल्याचं सांगितलं. पण भाजपने जोरदार पलटवार केला आणि तिच्यावर हटवलेले स्क्रीनशॉट सतत प्रसारित केल्याचा आरोप केला.

हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. नेटिझन्समधील काहींनी 2020 मधील एक मुलाखत शोधून काढली. यामध्ये कंगना रणौतने उर्मिला मातोंडकरवर राजकारणात प्रवेश केल्यावर अशाच प्रकारची निंदनीय कमेंट केली होती. त्या मुलाखतीत, कंगनाने उर्मिलाच्या अभिनयाची खिल्ली उडवली होती आणि तिला "सॉफ्ट पोर्न स्टार" म्हणून हिणवलं होतं. उर्मिलानं राजकारणात प्रवेश केल्यानंतर तिच्यावर कंगनाने केलेली आगपाखड सोयिस्करपणे कंगना विसरली असली तरी नेटिझन्स विसरलेले नाहीत हेच या गोष्टीतून पुन्हा एकदा पुढं आलं आहे.

उर्मिला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून राजकीय रिंगणात उतरली होती. या नंतर 2020 मध्ये उर्मिला शिवसेनेत सामील झाली. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी कंगनाच्या अपमानजनक वक्तव्याबद्दल तिच्यावर टीका केली होती. कंगनाच्या कमेंटनंतर बॉलिवूडमधील अनेकांमध्ये एकतेची लाट उसळली. त्यानंतर, स्वरा भास्कर, अनुभव सिन्हा आणि फराह खान अली सारख्या सेलिब्रिटींनी उर्मिलाच्या मागे ठाम उभं राहून कंगनाचा निषेध केला होता.

दरम्यान, कंगना-सुप्रिया श्रीनाते यांच्यातील वादात राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) निवडणूक आयोगाला पत्र पाठवून काँग्रेस सदस्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे. सुप्रिया यांच्या शिवाय किसान काँग्रेसचे राज्य सह-संयोजक एचएस अहिर यांनीही राणौत हिच्याबद्दल वादग्रस्त कमेंट केली आहे.

हेही वाचा -

  1. होळीच्या नावाखाली श्वानांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भडकली श्रद्धा कपूर, केला व्हिडिओ शेअर - shraddha kapoor
  2. 'फॅमिली स्टार' रिलीजपूर्वी मृणाल ठाकूरनं यल्लम्मा पोचम्मा मंदिरात केली प्रार्थना - Mrunal thakur
  3. तापसी पन्नू बरोबर लग्नाच्या बातम्या झळकत असताना मॅथियास बोईने दिल्या होळीच्या शुभेच्छा - Mathias Boe Extends Holi Wishes

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.