ETV Bharat / entertainment

लोकसभा निवडणूक 2024 जिंकल्यानंतर कंगना रणौत करणार बॉलिवूडला टाटा बाय बाय... - kangana ranaut - KANGANA RANAUT

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौतचा लोकसभा निवडणूक 2024मध्ये विजय झाला तर ती बॉलिवूड सोडणार आहे. तिनं एक मुलाखतीदरम्यान या गोष्टीवर आपलं मत मांडलं आहे.

Kangana Ranaut
कंगना रणौत (kangana ranaut (instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 2:23 PM IST

मुंबई - Kangana Ranaut : बॉलिवूड क्वीन कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कंगना रणौत बॉलिवूड सोडणार असल्याचं आता समजत आहे. कंगनाबद्दल सर्वांना माहिती आहे की, ती 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून तिच्या मूळ गावी हिमाचल प्रदेशातील मंडी या हाय-प्रोफाइल लोकसभा मतदारसंघातून लढत आहे. मंडी मतदारसंघातून तिकीट मिळताच तिनं निवडणूक रॅली करून जनतेला विकासाबद्दल काही सुंदर गोष्टी सांगत, त्यांचे मनं जिंकण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, कंगनाबद्दल असं बोललं जात आहे की, लोकसभा निवडणूक जिंकताच ती ग्लॅमरस दुनियेला म्हणजे बी-टाऊनला टाटा बाय बाय करेल.

'क्वीन' कंगना बॉलिवूडपासून होणार दूर : कंगना रणौतनं आपल्या ताज्या निवडणूक रॅलीत मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी स्वतःची तुलना केली आहे. कंगना राणौत म्हटलं होत की, "अमिताभ बच्चन यांच्यानंतर जर लोकांना कोणता स्टार सर्वात जास्त आवडत असेल तर ते मी आहे." या रॅलीमध्ये तिनं 2024 च्या लोकसभा निवडणूकबद्दल भाष्य केलं. तिनं म्हटलं, जर ती या निवडणुकीत विजयी झाली तर ती चित्रपटसृष्टी सोडेल. दरम्यान रिपोर्टनुसार सिनेसृष्टी सोडण्यामागचे कारण म्हणजे, खासदार झाल्यानंतर ती आपला परिसर आणि लोकांच्या विकासासाठी काम करण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. याशिवाय ती पूर्णपणे आपला वेळ जनतेसाठी देऊ शकेल.

कंगना राणौतचे आगामी चित्रपट : ती हळूहळू चित्रपटापासून दूर जाईल, असं तिनं सांगितलं होतं. कंगनानं एका मुलाखतीदरम्यान म्हटलं होत की, "मला चित्रपटांचाही कंटाळा येतो, मी अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून काम करत असते. राजकारणात मला भाग्य लाभले तर लोक माझ्याबरोबर येतील आणि मग मी फक्त राजकारणातच राहीन." दरम्यान कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती शेवटी 'तेजस' या चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. आता पुढं ती 'इमरजेंसी' आणि 'वेट्टायन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. डिलीट केलेल्या फोटोवर भाष्य करण्यासाठी सामंथा रुथ प्रभूने शेअर केली 'गूढ पोस्ट' - Samantha Ruth Parbhu
  2. जागतिक हास्य दिन साजरा करण्याची काजोलची खास पद्धत, केला मजेदार व्हिडिओ शेअर - world laughter day
  3. अभिषेक बच्चन 'हाउसफुल 5' च्या स्टार स्टडेट कास्टमध्ये परतणार, साजिद नाडियाडवालाची घोषणा - Housefull 5

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.