ETV Bharat / entertainment

कंगना रणौतनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर साधला निशाणा, काय म्हटलं जाणून घ्या... - Kangana Ranaut - KANGANA RANAUT

Kangana Ranaut on Ranbir kapoor : कंगना रणौत सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी देशातील वातावरण तापवत आहे. तिनं पुन्हा एकदा रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे. एका मुलाखतीतून तिनं रणबीर कपूरला टोमणा मारला आहे.

Kangana Ranaut on Ranbir kapoor
कंगना रणौतनं रणबीर कपूरवर म्हटलं (कंगना रणौत (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 31, 2024, 2:26 PM IST

मुंबई - Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत आणि वादग्रस्त यांच्यात जुनं नातं आहे. सक्रिय राजकारणात आल्यानंतरही ती अनेकदा वादग्रस्त विधान करताना दिसते. शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे कंगना सध्या चर्चेत आहे. तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप प्रमाणपत्र मिळालेलं नाही. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 6 सप्टेंबरला प्रदर्शित करण्याची निर्माता, प्रदर्शकाची योजना आहे. दरम्यान पुन्हा एकदा तिनं सोशल मीडियाच्या माध्यामातून आपली व्यथा मांडत बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणवर निशाणा साधला आहे.

कंगना रणौतचं वादग्रस्त विधान : कंगना रणौतनं काही वर्षापूर्वी रणबीरला तिच्या एक्स-हँडलवर 'सीरियल स्कर्ट चेझर' म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान जेव्हा कंगनाला तिच्या ताज्या मुलाखतीत या विधानाबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तिनं यावर पुन्हा विधान केलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आलं की, "बॉलिवूडचे लोक प्रोटीन खातात, त्यामुळे त्यांचा मेंदू खराब होतो." यावर उत्तर देताना कंगना म्हटलं, "मी हे बरोबर म्हटलं होतं आणि मी यावर ठाम आहे." यानंतर तिला विचारलं गेलं. "तुम्ही करण जोहरला चाचा चौधरी म्हटलं होतं." यावर कंगना म्हटलं, "जर हे लोक मला शांततेत जगू देत नाहीत, तर मीही त्यांना शांततेत जगू देणार नाही."

रणबीर कपूरवर कंगना रणौतची पोस्ट : त्यानंतर कंगनाला विचारण्यात आलं की, "तुम्ही रणबीर कपूरला 'सीरियल स्कर्ट चेझर' म्हटलं होतं'. यावर कंगनानं रागानं म्हटलं, "तुम्ही असं बोलत आहात जणू तो स्वामी विवेकानंद आहे." आयुष्मान खुरानाला गुंड म्हटल्याच्या प्रश्नावर कंगनानं म्हटलं, "जर एखादा स्टार थेट बोलला तर तो सर्वात वाईट दिसतो'. एका स्टारकिड्नं तिला उकडलेलं अंडं म्हटलं होतं, यावर कंगनानं तिखट प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान 2020 मध्ये कंगनानं तिच्या एक्सवरील पोस्टमध्ये रणबीर कपूरबद्दल लिहिलं होतं की, "रणबीर कपूर 'सीरियल स्कर्ट चेझर' आहे, पण त्याला कोणी बलात्कारी म्हणण्याची हिंमत करत नाही. दीपिकाला मानसिक आजार आहे, तिला कोणीही 'सायको' म्हणत नाही. ही नावं फक्त बाहेरच्या लोकांना ठेवली जातात, जे लहान शहरांतून आणि चांगल्या कुटुंबातून येतात." दरम्यान, अनेकांच्या नजरा कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटावर खिळल्या आहेत. 'इमर्जन्सी' चं प्रदर्शन 6 सप्टेंबरला नियोजित आहे. मात्र सेन्सॉर बोर्डानं अद्याप या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला नाही.

हेही वाचा :

  1. कंगना रणौत स्टारर 'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदीची मागणी, शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं पाठवली नोटीस - Emergency Trailer
  2. कंगना रणौतला 'इमर्जन्सी'साठी जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल - Kangana Ranaut
  3. कंगना राणौतला भाजपानं दिला दम! शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यापासून घेतली फारकत - Kangana Ranaut

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.