मुंबई - Vinesh Phogat: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटची खरडपट्टी काढल्यानंतर, अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौतनं आपलं विधान मागे घेतलं आहे. विनेश अपात्र ठरल्यानंतर तिला पाठिंबा देत असल्याचा ड्रामा कंगना करत असल्याचं आता अनेकांना वाटत आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर तिनं सोशल मीडियावर विनेशचे दोन फोटो शेअर केले आहेत. साऊथची सुपरस्टार नयनतारानं विनेशसाठी एक खूप सुंदर संदेश लिहिला आहे. यावेळी अनेक स्टार्स विनेशला दिलासा देत आहेत.
कंगना रणौतनं शेअर केली पोस्ट : कंगना रणौतनं विनेश फोगटच्या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहिलं, "विनेश रडू नकोस, संपूर्ण देश तुझ्या पाठीशी उभा आहे." दुसऱ्या एका फोटोत विनेश पी टी उषाबरोबर हॉस्पिटलच्या बेडवर बसून बोलताना दिसत आहे. या फोटोवर तिनं कॅप्शनमध्ये "शेरणी" लिहिलंय. साऊथची अभिनेत्री नयनतारानं विनेशचा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, "चिन अप वॉरियर, तुम्ही अनेकांना प्रेरणा देता आणि तुमचे मूल्य विजयानं मोजले जाऊ शकत नाही. तुम्हाला एक मोठी भेट मिळाली आहे खूप प्रेम, जे कोणत्याही यशापेक्षा मोठं आहे. अभिमानानं आपलं डोक उंच ठेवा, तुम्ही कौतुकास्पद काम केलंय, खूप प्रेम नयनतारा."
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
विनेश फोगट घेतली कुस्तीमधून निवृत्ती : पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर, विनेश फोगटनं गुरुवारी 8 ऑगस्टच्या पहाटे तिची निवृत्ती जाहीर केली. तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्तीतून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर निवृत्तीची घोषणा करताना तिनं खूप भावनिक संदेश पोस्ट केला आहे. यात तिनं लिहिलं, "आई, माझ्याकडून कुस्ती जिंकली, मी हरले. माफ कर, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सर्व काही तुटले, माझ्याकडे यापेक्षा जास्त ताकद नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन, क्षमस्व."
ऑलिम्पिक 2024मध्ये विनेश फोगटचा सामना : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटची कामगिरी उत्कृष्ट होती. महिला कुस्तीच्या 50 किलो गटाच्या पहिल्या फेरीत विनेशनं 10 सेकंदांनी पुनरागमन करत चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव केला. यानंतर तिनं उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत तिनं युस्नेलिस गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होतं.
हेही वाचा :