मुंबई - Indian 2 Trailer : साउथ फिल्म इंडस्ट्रीचा मेगास्टार कमल हासन त्याचा मोस्ट अवेटेड फिल्म 'इंडियन 2'मुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट आता रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल एक अपडेट शेअर केली आहे. आज, 25 जून रोजी सकाळी निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर याबद्दलची घोषणा केली आहे. लाइका प्रोडक्शननं मंगळवारी त्यांच्या अधिकृत एक्सवर पोस्टमध्ये लिहिलं, "उत्साहानं भरलेला 'इंडियन 2'चा ट्रेलर आज संध्याकाळी 7 वाजता रिलीज होणार आहे. सेनापतीच्या रोमांचक गाथेच्या झलकसाठी सज्ज व्हा."
Brimming with excitement! 🤩 The #Indian2 🇮🇳 trailer drops today at 7️⃣ PM. Get ready for an exhilarating glimpse into Senapathy's epic saga! 🤞🏻🔥 @IndianTheMovie 🇮🇳 Ulaganayagan @ikamalhaasan @shankarshanmugh @anirudhofficial @LycaProductions #Subaskaran @RedGiantMovies_… pic.twitter.com/JMbSZTvhFm
— Lyca Productions (@LycaProductions) June 25, 2024
'इंडियन 2'चा ट्रेलर आज होईल रिलीज : चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्यापूर्वी चेन्नईमधील मीडियाला दाखवण्यात आला. कमल हासन 'इंडियन 2' मध्ये कमांडरच्या भूमिकेत पुनरागमन करत आहे. या चित्रपटात कमल हासन व्यतिरिक्त सिद्धार्थ, काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर, विवेक, नेदुमुदी वेणू, गुलशन ग्रोवर, एसजे सूर्या आणि बॉबी सिम्हा यांसारखे अनेक स्टार्स आहेत. अनिरुद्ध रविचंदर यांनी 'इंडियन 2'ला संगीत दिलं आहे. या चित्रपटामध्ये एक चांगला संदेश समाजाला देण्यात येणार आहे. 'इंडियन 2' या ॲक्शन चित्रपटाचं दिग्दर्शन एस. शंकर यांनी केलं आहे. लायका प्रॉडक्शननं पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आहे.
कमल हासनचे आगामी चित्रपट : हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'इंडियन 2' चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल. 'इंडियन 2' चित्रपट पाहण्यासाठी आता अनेकजण आतुर आहेत. दरम्यान 1996मध्ये प्रदर्शित झालेला 'इंडियन' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामध्ये कमल हासनशिवाय उर्मिला मातोंडकर, मनिषा कोईराला आणि सुकन्या यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता 'इंडियन 2'कडून देखील चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. तसेच कमल हासनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'विक्रम 2', 'ठग लाइफ', 'थेवर मगन 2', 'आमरण', 'कल्कि 2898 एडी' आणि 'पापनासम 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय त्यांच्याकडे आणखी काही प्रोजेक्ट्स आहेत.
हेही वाचा :
- 5 महिन्यांत जिममध्ये घाम गाळून 26 किलोपेक्षा कमी वजन केल्यानंतर जयदीप अहलावत केलं चाहत्यांना प्रभावित - JAIDEEP AHLAWAT
- खाऊ गल्लीत नीता अंबानींनी चाट समोस्यावर मारला ताव, चाटवाल्याला दिलं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण - NITA AMBANI EAT VARANASI CHAAT
- शाहरुख खान लंडनमध्ये कुटुंबासह खेळला क्रिकेट, फोटो व्हायरल - shah rukh khan