ETV Bharat / entertainment

कमल हासन स्टारर 'इंडियन 2' ऑडिओ लॉन्चची जय्यत तयारी सुरू, राम चरण- रणवीर सिंगसह दिग्गज स्टार्स लावणार हजेरी - Kamal Haasan - KAMAL HAASAN

Kamal Haasan starrer Indian 2 : कमल हासन स्टारर इंडियन 2 च्या निर्मात्यांनी चित्रपटाची ऑडिओ लॉन्च करण्याची जोरदार तयारी केली असून लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. या कार्यक्रमात दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंतचे स्टार्स सहभागी होत असल्याची बातमी आहे.

Kamal Haasan starrer 'Indian 2'
कमल हासन स्टारर 'इंडियन 2' (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 4:24 PM IST

मुंबई - साऊथ सुपरस्टार कमल हासन आणि शंकर दिग्दर्शित 'इंडियन 2' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ऑडिओ लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. याशिवाय कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांची नावेही जाहीर झाली आहेत. प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवीसह साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज स्टार्स या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही तर बॉलिवूडमधील रणवीर सिंगही या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचं समजतंय.

कमल हसन स्टारर 'इंडियन 2' चा ऑडिओ लॉन्च सोहळा 1 जून रोजी चेन्नईच्या नेहरू इनडोअर स्टेडियमवर पार पडणार आहे. यासाठी निर्मात्यांनी तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी, राम चरण, बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना ऑडिओ लॉन्चला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं आहे. या अभिनेत्यांव्यतिरिक्त दिग्दर्शक मणिरत्नम आणि इतर अनेक स्टार्सही या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

निर्मात्यांना या कार्यक्रमात विविध इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींचा समावेश करायचा आहे. या अभिनेत्यांव्यतिरिक्त दिग्दर्शक मणिरत्नम आणि इतर सेलेब्रिटी स्टार्सनाही आमंत्रण दिलं जाणार आहे. मात्र, 'इंडियन 2' टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आशा आहे की निर्माते लवकरच त्याची घोषणा करतील.

'इंडियन 2' हा बहुप्रतीक्षित चित्रपट 12 जुलै रोजी अनेक भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी देखील पुष्टी केली आहे की 'इंडियन 3' चे शूटिंग पूर्ण झालं आहे. 'इंडियन 3' चा टीझर 'इंडियन 2' बरोबर जोडला जाणार असल्याचे बोलले जात आहे. कमल हासन या चित्रपटात कमांडरच्या भूमिकेत आहे. काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंग, सिद्धार्थ, एसजे सूर्या, बॉबी सिम्हा आणि प्रिया भवानी शंकर असे अनेक सहकलाकार आहेत.

हेही वाचा -

  1. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडींचा नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारानं होणार सन्मान - Ashok Saraf and Rohini Hattangadi
  2. मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट : कुटुंबाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा 'भैय्या जी' - Bhaiyya Ji Movie Promotion
  3. FTII विद्यार्थ्यांच्या 'सनफ्लॉवर' चित्रपटानं जिंकलं 'कान्स 2024' मधील सर्वोच्च पारितोषिक - CANNES FILM FESTIVAL 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.