ETV Bharat / entertainment

कल्की 2898 एडीच्या ट्रेलरमध्ये दिसली 'अंतिम युद्धा'ची झलक, ट्रेलरला अभूतपूर्व प्रतिसाद - Kalki 2898 AD trailer - KALKI 2898 AD TRAILER

Kalki 2898 AD trailer : कल्की 2898 एडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक चकित झाले आहेत. प्रभास स्टारर चित्रपटाच्या निर्मात्यांनी 27 जून रोजी चित्रपटाच्या रिलीजपूर्वी प्रभावी ट्रेलरचं लॉन्चिंग केलं.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी ((Film poster/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 9:55 AM IST

मुंबई - Kalki 2898 AD trailer : प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोणसारख्या दिग्गज कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरनं चाहते आणि चित्रपट रसिकांमध्ये अमाप उत्साह निर्माण झाला आहे. 'कल्की 2898 एडी' ट्रेलरचे शुक्रवारी लॉन्चिंग करण्यात आलं. भव्य दृष्य असलेल्या या ट्रेलरमध्ये भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळते.

'कल्की 2898 AD' च्या ट्रेलरने प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यातील तीव्र संघर्षाचे संकेत मिळाल्यानं चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दीपिका पदुकोण आणि शोभना यांची झलक ट्रेलरचं आकर्षण आणखी वाढवत आहे. शेवटी प्रभासचा प्रभावी संवाद एकूणच उत्साह वाढवणारा आहे. "युग आये और गये कितने मौके मिलें तुम्हें, पर इन्सान न बदले और न बदलेंगे.", असा जोरदार संवाद कमल हासनच्या तोंडी आहे.

'कल्की 2898 एडी' ट्रेलर लॉन्च होताच प्रचंड व्हायरल बनला आहे. यूट्यूबसह सोशल मीडियावर करोडो व्यूव्ह्ज मिळाले आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची किती उत्कंठा प्रेक्षकांच्यात आहे हे दिसून येतं. 2898 मध्ये पोस्ट-अपोकॅलिप्टिक काशीच्या पार्श्वभूमीवर सेट केलेला, हा भव्य चित्रपट भारतीय सिनेमासृष्टीतील सर्वात विलक्षण निर्मितींपैकी एक आहे.

'कल्की 2898 एडी'च्या रिलीज ट्रेलरमध्ये दिसतंय की प्रभासनं यामध्ये भैरवाची भूमिका केली आहे, दीपिका पदुकोण सुमतीला मूर्त रूप देते, तर अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, कमल हासन खलनायक सुप्रीम यास्किनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या कलाकारांमध्ये दिशा पटानी, पशुपती, अण्णा बेन, सास्वता चॅटर्जी आणि राजेंद्र प्रसाद यांचाही समावेश आहे.

संतोष नारायणन यांचे संगीत आणि जोर्डजे स्टोजिल्जकोविक यांच्या सिनेमॅटोग्राफीसह, 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट वैजयंती मूव्हीजचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. नाग अश्विनचा महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट 27 जून रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ आणि इतर भाषांमध्ये जागतिक स्तरावर प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा -

"मी खरं बोललो तर अभय देओल तोंड दाखवायला जागा राहणार नाही" : अनुराग कश्यप - ANURAG KASHYAP ON PANKAJ JHA

"स्वप्न खरं झालं": गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित चित्रपटात सनी देओलबरोबर भूमिका साकारणार सैयामी खेर - Saiyami Kher

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाआधी थरारक 'काकुडा'ची रिलीज तारीख जाहीर - Kakuda Release Date

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.