ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के पूर्ण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लॉक - kalki 2898 ad part 2 - KALKI 2898 AD PART 2

kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी' जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे आणि दुसरीकडे, 'कल्की 2898 एडी' भाग 2 बद्दल एक रोमांचक बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा भाग 2 अर्ध्याहून अधिक तयार झाला आहे.

kalki 2898 AD
कल्की 2898 एडी ((IMAGE- SAREGAMA))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 5:58 PM IST

मुंबई - kalki 2898 AD : ' कल्की 2898 एडी' हा साऊथ चित्रपट सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. बाहुबली अभिनेता प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' हा 27 जून रोजी प्रदर्शित झाला असून हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आता इतिहास रचताना दिसत आहे. या चित्रपटानं दोन दिवसांच्या कलेक्शनमध्ये 300 कोटीचा टप्पा ओलांडणार असं सध्या दिसत आहेत.' कल्की 2898 एडी'ला प्रेक्षक आणि समीक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी असेही म्हटलं आहे की 'कल्की 2898 एडी' पाहिल्यानंतर, हा एका वेगळ्या स्तराचा चित्रपट आहे. साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांनीही हा चित्रपट पाहिला. याशिवाय त्यांनी एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टीच्या रिलीजची वाट मी पाहात असल्याचं म्हटलं होतं.

'कल्की 2898 एडी'चा दुसऱ्या पार्टवर काम सुरू : 'कल्की 2898 एडी'चा दुसरा भाग चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याची पुष्टी झाली आहे. आत या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल एक अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाचा दुसरा पार्ट हा देखील काही दिवासांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर सध्या जोरदार काम सुरू आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स 1000 नक्की कमवेल असे प्रभासचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगताना दिसत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनेक चित्रपटगृहांचे शो हे सध्या हाऊसफुल सुरू आहे. हा चित्रपट 'जवान' आणि पठाण रेकॉर्ड तोडू शकतो.

'कल्की 2898 एडी' पार्टी 2 : याशिवाय साऊथ स्टार नागार्जुननं देखील या चित्रपटाबद्दल कौतुक केलं आहे. दरम्यान 'कल्की 2898 एडी' चे निर्माते अश्विनी दत्त यांनी चित्रपटाच्या भाग 2ची अपडेट देताना सांगितलं की, 'कल्की 2898 एडी'ची कहाणी कमल हासनला सांगताना नाग अश्विननं दुसरा भाग बनवण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाचे अहवालांवर विश्वास ठेवला तर, 'कल्की 2898 एडी'च्या भाग 2ची शूटिंग 60 टक्के झाली आहे आणि व्हिएएफएक्स (VFX ) वर काम सुरू आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांतनं पोस्ट शेअर करून प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचं केलं कौतुक - KALKI 2898 AD
  2. कृतिका मलिकनं धक्कादायक विधान; बिग बॉसमध्ये खळबळ, पती अरमान मलिकलाही धक्का - bigg boss ott 3
  3. कतरिना कैफनं पती विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज'च्या ट्रेलरवर दिली प्रतिक्रिया, झाली पोस्ट व्हायरल - KATRINA KAIF

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.