ETV Bharat / entertainment

शोभना चंद्रकुमार दिसणार 'मरियम'च्या भूमिकेत, 'कल्की 2898 एडी'चं नवीन पोस्टर रिलीज - Kalki 2898 AD

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 3:25 PM IST

Kalki 2898 AD New Poster: प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटातील नवीन पात्राचे पोस्टर रिलीज केलं आहे.

Kalki 2898 AD New Poster
कल्की 2898 एडीचं नवीन पोस्टर ('कल्कि 2898 एडी' (फाईल फोटो) (IANS))

मुंबई - Kalki 2898 AD : साऊथ स्टार प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' हा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 8 दिवसांनी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. निर्माते आता या चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी करत आहेत. मुंबईत आज 19 जून रोजी 'कल्की 2898 एडी'च्या रिलीजपूर्वी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्री-रिलीजच्या आधी, निर्मात्यांनी चित्रपटाचं काउंटडाउन पोस्टर रिलीज केलंय. यामध्ये एक नवीन कलाकार दिसत आहे. बुधवार, 19 जून रोजी 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या काउंटडाउन पोस्टरसह नवीन पात्राची ओळख करून दिली आहे.

'कल्की 2898 एडी'मधील पोस्टर रिलीज : या पोस्टरमधील कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून यात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना-अभिनेत्री शोभना चंद्रकुमार दिसत आहे. निर्मात्यांनी शोभनाचा फर्स्ट लूक रिलीज केला असून यामध्ये ती खूप गंभीर असल्याच्या दिसत आहे. या चित्रपटात 'मरियम'ची महत्त्वपूर्ण भूमिका ती साकारताना दिसणार आहे. निर्मात्यांनी रिलीज केलेल्या पोस्टरवर लिहिलं आहे की, "त्यांच्या पूर्वजांनीही त्यांच्याप्रमाणेच वाट पाहिली. 'कल्की 2898' रिलीज होण्यास 8 दिवस बाकी." 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विननं केलं आहे. हा चित्रपट अतिशय बारकाईनं बनवला गेला आहे. 'कल्की 2898' बनवताना त्यांनी प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेतली आहे.

'कल्की 2898 एडी'चं बजेट : प्रभासशिवाय या चित्रपटात बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांसारखे प्रसिद्ध कलाकार दिसणार आहेत. 'कल्की 2898 एडी'ची निर्मिती वैजयंती मुव्हीजनं केली आहे. बहुभाषिक, पौराणिक कहाणीनं प्रेरित असलेला हा सायन्स फिक्शन चित्रपट 27 जून रोजी पडद्यावर येईल. या चित्रपटामध्ये साऊथ स्टार कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाची निर्मिती ही 600 कोटी रुपयांमध्ये करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर चाहत्यांना खूप पसंत पडला होता. आता हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक असून आपल्या प्रतिक्रिया ते या पोस्टवर देताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये कार्तिक आर्यन आईसह लावणार हजेरी, प्रोमो रिलीज - kartik aaryan
  2. 'कल्की 2898 एडी'च्या प्री-रिलीझ इव्हेंटसाठी प्रभास मुंबईत दाखल, दीपिका पदुकोण टीममध्ये होईल सामील? - kalki 2898 ad pre release event
  3. बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.