ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी' निर्मात्यांनी आंध्र प्रदेशला पूरग्रस्तांसाठी दिली 25 लाख रुपयांची मदत - Andhra Pradesh Relief Fund - ANDHRA PRADESH RELIEF FUND

Andhra Pradesh Relief Fund :'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी आंध्र प्रदेशातील पूर परिग्रस्तांसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सरकारला 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. सध्या या भागामधील परिस्थिती खूप गंभार असल्याचं दिसत आहे.

Andhra Pradesh Relief Fund
आंध्र प्रदेश मदत निधी ((ETV Bharat and Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 3, 2024, 12:52 PM IST

मुंबई - Andhra Pradesh Relief Fund : आंध्र प्रदेशात गंभीर पूर आल्यानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी अनेकांची घरं जलमय झाली असून सर्वसामान्यांचे जगणे देखील कठीण झालं आहे. राज्यात सर्वत्र पुरामुळे हाहाकार माजला आहे. लोकांना घरे सोडून सरकारी आश्रयस्थानांमध्ये राहावे लागत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये पुरामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात विजयवाड्यात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाल्याची देखील दिसत आहे. आंध्र प्रदेश सरकार आता लोकांचे जीवन पूर्वपदावर आणण्याचं काम खूप वेगानं करत आहे.

'कल्की'च्या निर्मात्यांनी 25 लाखांची देणगी दिली : दरम्यान साउथ सुपरस्टार प्रभास स्टारर चित्रपट 'कल्की 2898 'ए़डी'च्या निर्मात्यांनी पूरग्रस्त आंध्र प्रदेश सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्माते वैजयंती मूव्हीज यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी आंध्र प्रदेश सरकारला 25 लाख रुपयांची मदत दिली असल्याचं सांगितलं आहे. या पोस्टवर 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी लिहिलं, "आम्ही आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 25 लाख रुपयांची मदत देत आहोत, या राज्यानं आम्हाला खूप काही दिलं आहे आणि काहीतरी परत देणे हे आमचे कर्तव्य आहे. देशभरात मदतीचा हात पुढे केला जाईल, कारण आपल्याला एकत्र उभे राहण्याची गरज आहे."

आंध्र प्रदेशची परिस्थिती गंभीर : वैजयंती मुव्हीजनं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि त्यांचा मोठा भाऊ मेगास्टार चिरंजीवी यांच्यासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन स्टारर 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट प्रदर्शनानंतर बऱ्याच दिवसांनंतर आजही चर्चेत आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 जून रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी' हिंदी आवृत्तीमध्ये नेटफ्लिक्सवर झाला प्रसारित - kalki 2898 ad hindi version
  2. प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' 'या' तारखेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित - KALKI 2898 AD
  3. 'कल्कि 2898 एडी'नं बॉक्स ऑफिसवर 25 दिवसात मोडला 'आरआरआर'चा विक्रम - prabhas film

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.