मुंबई - Kalki 2898 AD : प्रभासची भूमिका आणि नाग अश्विनचं दिग्दर्शन असलेला बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 एडी' हा असलेला चित्रपट अखेर 27 जून रोजी रुपेरी पडद्यावर पोहोचला. प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद देत उत्तम म्हटल्यानंतर या चित्रपटाला मेगास्टार चिरंजीवी आणि शोबू यरलागड्डा यांसारख्या इंडस्ट्रीतील दिग्गजांच्याहीव टाळ्या मिळवल्या आहेत. उत्कृष्ट चित्रपट दिल्याबद्दल त्यांनी 'कल्की' टीमचं स्वागत केलं आहे.
Hearing fabulous reports about #Kalki2898AD !
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) June 27, 2024
Kudos to @nagashwin7 for your creative genius for making this Mytho-Sci-Fi futuristic film with such stellar star cast with @SrBachchan #Prabhas @deepikapadukone & @ikamalhaasan
Hearty Congratulations to my favourite producer…
चिरंजीवीनं सोशल मीडिया X वर पोस्ट केलेल्या एका नोटमध्ये नमूद केलं आहे की, " 'कल्की 2898 एडी' सकारात्मक समीक्षण ऐकून अमिताभ बच्चन यांच्यासारख्या उत्कृष्ट स्टारकास्टसह हा मायथालॉजिकल सायन्स फिक्शन चित्रपट बनवल्याबद्दल नाग अश्विन, तुमच्या सर्जनशील प्रतिभेचं अभिनंदन. प्रभास, कमल हासन आणि माझ्या आवडत्या निर्मात्या स्वप्ना दत्त, प्रियांका दत्त यांचं हार्दिक अभिनंदन. भारतीय चित्रपटाचा ध्वज अधिक उंच करा. "
Congratulations to @nagashwin7 and the entire team @Kalki2898AD for epic effort! The film sets new benchmarks for vfx and technical excellence for Indian films! #Prabhas especially in climax is mind blowing! @SrBachchan sir was phenomenol! @SwapnaDuttCh & Priyanka you guys…
— Shobu Yarlagadda (@Shobu_) June 27, 2024
दरम्यान, शोबू यारलागड्डा यांनी देखील X वर दिग्दर्शक नाग अश्विन आणि टीमचं त्यांच्या या महत्त्वपूर्ण प्रयत्नाबद्दल अभिनंदन केलं आणि म्हटलं, " नाग अश्विन आणि संपूर्ण टीम 'कल्की 2898 एडी'चं या भव्य प्रयत्नासाठी अभिनंदन! हा चित्रपट भारतीय चित्रपटांसाठी व्हीएफएक्स आणि तांत्रिक उत्कृष्टतेसाठी नवीन बेंचमार्क सेट करणारा आहे! प्रभास विशेषत: क्लायमॅक्समध्ये मनाला भिडणारा आहे! अमिताभ बच्चन सर अभूतपूर्व होते! स्वप्ना दत्त आणि प्रियंका तुम्ही लोकांनी अशक्य गोष्ट करुन दाखवली ! तुम्हा सर्वांना सलाम!"
प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकार असलेल्या या साय-फाय चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये भारतात अंदाजे 95 कोटी रुपयांची कमाई केली, तर त्याचे एकूण संकलन सुमारे 118 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पहिल्या दिवशी, या थ्रिलर चित्रपटानं जगभरात 180 कोटींहून अधिक कमाई केली.
हेही वाचा -
- तब्बल 39 वर्षानंतर बिग बी-कमल हासन एकत्र, 'कल्की 2898 एडी'ला मुंबईतील प्रेक्षकांची पसंती - Kalki 2898 AD
- भारतीय चित्रपट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सलामीवीर ठरला प्रभासचा 'कल्की 2898 एडी' - Kalki 2898 AD Box Office Day 1
- रजनीकांतचा 'कुली'मधील लूक टेस्टचा फोटो व्हायरल, पाहा पोस्ट - Rajinikanth first look photo