मुंबई - Kalki 2898 AD Box Office : साऊथचा सुपरस्टार प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'नं बॉक्स ऑफिसवर 25 दिवस पूर्ण केले आहेत. या 25 दिवसांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. याशिवाय 'कल्की 2898 एडी'नं जगभरात 1000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता 'कल्की 2898 एडी'नं आपल्या 25व्या दिवसाच्या कमाईतून एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'आरआरआर' या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटाचा विक्रम मोडला गेला आहे. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चौथ्या वीकेंडमध्ये सुरू आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
'कल्की 2898 एडी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : गेल्या तीन दिवसांत या चित्रपटानं 17.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हिंदी पट्ट्यात या चित्रपटानं 25 दिवसांत 275.9 कोटींची कमाई केली आहे. यासह, प्रभासचा 'कल्की 2898 एडी' हा साऊथ चित्रपटसृष्टीतील हिंदी पट्ट्यातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'कल्की 2898 एडी'नं ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर चित्रपट 'आरआरआर'चा विक्रम मोडल्यानंतर आता प्रभासचे चाहते खुश आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'आरआरआर'नं हिंदी पट्ट्यात 272 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. 'कल्की 2898 एडी'चं देशांतर्गत कलेक्शन 616.95 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आता हा चित्रपट बॉलिवूड स्टार शाहरुख खान स्टारर 'जवान'च्या देशांतर्गत कलेक्शन (643.87 कोटी रुपये)चा विक्रम मोडू शकतो. जर 'कल्की 2898 एडी'नं 'जवान'चा हा विक्रम मोडला तर हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरेल. दरम्यान कल्की 2898 एडी हा जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी रुपये कमावणारा भारतीय चित्रपट उद्योगातील 7वा चित्रपट ठरला आहे.
सॅकनिल्कच्या मते, 'कल्की 2898 एडी'नं
पहिला आठवडा: रु. 414.85 कोटी (देशांतर्गत बॉक्स ऑफिस), रु. 162.5 कोटी (हिंदी)
दुसरा आठवडा : रु 128.5 कोटी (देशांतर्गत बॉक्स ऑफिस), रु 70.4 कोटी (हिंदी)
तिसरा आठवडा: रु. 56.1 कोटी (देशांतर्गत बॉक्स ऑफिस), रु. 33 कोटी (हिंदी)
शुक्रवार: रु. 2.9 कोटी
शनिवार: रु. 6.1 कोटी
रविवार: रु. 8.4 कोटी
एकूण - रु. 616.85 कोटी (देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन) रु. 275.9 कोटी (हिंदी)
हिंदी पट्ट्यातील सर्वाधिक कमाई करणारे साऊथ चित्रपट
'बाहुबली 2'- 511 कोटी रुपये
'केजीएफ 2'- 435 कोटी
'कल्कि 2898 एडी'- 275.9 कोटी
'आरआरआर'- 272.78 कोटी