मुंबई Kalki 2898 AD Box Office Day 2 : जगभरात बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस पूर्ण झाले. हा चित्रपट 27 जून रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सॅकनिल्क रिपोर्टनुसार 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 95.3 कमाई केली. तसेच जगभरात या चित्रपटानं 191.5 कोटींची कमाई केली. आज 29 जून रोजी 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवसात प्रवेश केला आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चित्रपटनं बॉक्स ऑफिसवर 54 कोटीची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई 149.3 कोटी देशांतर्गत झाली आहे. दरम्यान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप झपाट्यानं कमाई करत आहे.
'कल्की 2898 एडी'ची क्रेझ : 'कल्की 2898 एडी' हा प्रभासच्या कारकिर्दीतील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'आरआरआर' (223 कोटी) आणि 'बाहुबली 2' (217 कोटी) नंतर 'कल्की 2898 एडी' हा भारतीय चित्रपटांपैकी तिसरा सर्वात मोठा ओपनर बनला आहे. भारतात हा चित्रपट लवकरच 200 कोटीचा आकडा गाठणार आहे. 'कल्की 2898 एडी' शनिवारी आणि रविवारी चांगली कमाई करुन शकतो, अशी अपेक्षा या चित्रपटाचे निर्माते करत आहेत. 'कल्की 2898 एडी' प्रेक्षकांना खूप पसंत पडला आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहेत.
आठवड्याच्या शेवटी किती कमाई कराल? : दरम्यान दुसऱ्या दिवशी, 'कल्की 2898 एडी'साठी तेलुगू बेल्ट थिएटरमध्ये 65.02 टक्के रेकॉर्ड ऑक्युपन्सी रेट नोंदवला गेला. चित्रपट व्यापार विश्लेषकांचा असा विश्वास आहे, की हा चित्रपट रिलीजच्या चार दिवसात वीकेंड कलेक्शनमध्ये, जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपयांचा आकडा सहज गाठेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे.'कल्की 2898 एडी' चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दिशा पटानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा :