ETV Bharat / entertainment

भारतीय चित्रपट इतिहासातील तिसरा सर्वात मोठा सलामीवीर ठरला प्रभासचा 'कल्की 2898 एडी' - Kalki 2898 AD Box Office Day 1 - KALKI 2898 AD BOX OFFICE DAY 1

Kalki 2898 AD Box Office Day 1:प्रभासची प्रमुख भूमिका असलेल्या 'कल्की 2898 एडी' चित्रपटानं देशांतर्गत तसेच परदेशी बाजार पेठेमध्ये बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर इतिहास रचून रेकॉर्डब्रेक ओपनिंग केली आहे.

Kalki 2898 AD Box Office Day 1
कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 9:57 AM IST

मुंबई - Kalki 2898 AD Box Office Day 1: दिग्दर्शक नाग अश्विनच्या 'कल्की 2898' एडी चित्रपटानं गुरुवारी बॉक्स ऑफिसवर शानदार पदार्पण केलं. या सायन्स फिक्शन चित्रपटानं प्रभासच्या स्टार पॉवर आणि प्रेक्षकांच्या माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर अवलंबून राहून पहिल्याच दिवशी भारतात १०० कोटींहून अधिक कमाई केली. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांच्या भूमिका असलेल्या 'कल्की 2898 एडी'नं, भारतीय चित्रपटसृष्टीतील तिसरी सर्वात मोठी ओपनिंग नोंदवून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये भारतात अंदाजे 95 कोटी रुपयांची कमाई केली, तर त्याचे एकूण संकलन सुमारे 118 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. पहिल्या दिवशी, या थ्रिलर चित्रपटानं जगभरात 180 कोटींहून अधिक कमाई केली. या प्रचंड कलेक्शनसह, 'कल्की 2898 एडी'नं 'केजीएफ 2' (159 कोटी), 'सालार' (158 कोटी), 'लिओ' (142.75 कोटी), 'साहू' (130 कोटी) आणि 'जवान' (129 कोटी रुपये) चे जागतिक ओपनिंग रेकॉर्ड मोडले आहेत.

असं असलं तरी एसएस राजामौलीच्या 'आरआरआर' चित्रपटानं 223 कोटी रुपयांची पहिल्या दिवशी विक्रमी कमाई केली होती. हा चित्रपट सर्वोच्च भारतीय सलामीवीर म्हणून शिखरावर कायम आहे. त्यानंतर 'बाहुबली 2' यानं पहिल्या दिवशी 217 कोटींहून अधिक कमाई केली. प्रभास स्टारर पहिल्या दिवशी 200 कोटींची कमाई करण्यात अयशस्वी ठरला आहे. ही अपेक्षा अनेकांनी बाळगली होती. चित्रपटानं 200 कोटींचा टप्पा अगदी कमी फरकानं चुकवला आणि त्यामुळे तो तिसरा सर्वात मोठा ओपनर ठरला.

'कल्की' चित्रपट बाहुबलीच्या विक्रमाला मागं टाकू शकला नसला तरी चार दिवसांच्या वीकेंडसह, नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट राजामौलीच्या 'आरआरआर' आणि 'बाहुबली 2' च्या वीकेंड कलेक्शनला मागे टाकण्याची संधी आहे. व्यापार विश्लेषकांचा अंदाज आहे की वीकेंडला 600-कोटी रुपया पर्यंतचा पल्ला 'कल्की' गाठू शकेल आणि 1000 कोटींहून अधिकची एकूण कमाई होईल. 'कल्की 2898 एडी' 27 जून रोजी जगभरात रिलीज झाला आणि सर्व भाषांमध्ये 20 लाखांहून अधिक तिकिटे आगाऊ विकली गेली होती.

हेही वाचा -

रजनीकांतचा 'कुली'मधील लूक टेस्टचा फोटो व्हायरल, पाहा पोस्ट - Rajinikanth first look photo

इतिहासातलं सुवर्णपान रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी येत आहे 'भूपती', मोशन पोस्टर लॉन्च - motion poster of Bhupathi

अनंत अंबानीनं लग्नासाठी अक्षय कुमारला केलं आमंत्रित, व्हिडिओ व्हायरल - ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.