मुंबई - Kajol : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री काजोल गेली अनेक वर्षे चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या अभिनयानं अनेकांचं मनोरंजन करत आहे. तिनं आपल्या दमदार चित्रपटांनी लोकांची मनं जिंकली आहेत. काजोल अनेकदा आपले मत खूप बिनधास्त मांडताना दिसते. सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. अलीकडेच, लाफ्टर्स डेच्या निमित्तानं तिनं इंस्टाग्रामवर असा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाला पण हसायला येईल. या व्हिडिओमध्ये ती चार वेळा पडताना दिसत आहे.
काजोलनं शेअर केला मनोरंजक व्हिडिओ : काजोल प्रत्येक क्लिपमध्ये ती उभी असताना, चालताना आणि सायकल चालवताना पडताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, "माझे सर्व फोटो पाहिल्यानंतर मला कळलं की, माझे वागणे आश्चर्यकारकपणे चांगले आहे! चला तर मग शांत होऊया आणि इतर लोकांना हसवणारे काही व्हिडिओ पुन्हा पाहू या." या व्हिडिओच्या पहिल्या क्लिपमध्ये काजोल दुर्गा पूजा पंडालमध्ये पडताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओच्या क्लिपमध्ये ती सुरक्षेदरम्यान चालत असताना पडते. तिसरी क्लिप 'दिलवाले'च्या प्रमोशनदरम्यानची आहे, जेव्हा ती उभी असताना पडते. यानंतर तिला अचानकपणे वरुण धवन पकडतो. याशिवाय शेवटच्या क्लिपमध्ये ती 'कुछ कुछ होता है' चित्रपटाच्या शु़टिंगदरम्यान सायकल चालवताना पडते. काजोलचा हा व्हिडिओ पाहून आता अनेकजण या पोस्टवर हसणार इमोजी पोस्ट करताना दिसत आहेत.
काजोलचा आगामी चित्रपट : काजोलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी देवयानीच्या भूमिकेत 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये दिसली होती. याआधी तिनं 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये नयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारली होती. तिचे दोन्ही पात्रे खूप चाहत्यांना खूप आवडली होती. काजोलनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'द ट्रायल' या वेब सीरीजद्वारे पदार्पण केलं होतं. आता पुढं ती आणखी अनेक प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तिच्याकडे 'सरजमीन' आणि 'मां' असे काही चित्रपट आहेत. तसेच ती अभिनेत्री क्रिती सेनॉनबरोबर 'दो पत्ती'मध्ये दिसणार आहे. यापूर्वी या दोघींनी 'दिलवाले'मध्ये एकत्र काम केलं होतं.
हेही वाचा :
- तमन्ना भाटिया स्टारर 'अरनमनाई 4'मधील विजय वर्मानं केलं पोस्टर शेअर - vijay varma share post
- प्रियांका चोप्रानं करीना कपूरला युनिसेफ इंडियाची नेशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर दिल्या शुभेच्छा - Priyanka Wishes Kareena
- रणबीर कपूर आणि आलिया भट्टची मुलगी राहाबरोबर अयान मुखर्जी झाला स्पॉट - ayan mukerji spotted with raha