मुंबई - Vedaa teaser released : जॉन अब्राहम स्टारर 'वेदा' या चित्रपटाचा टीझर आज 19 मार्च रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. जॉनबरोबर या चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर खूप दमदार आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये तमन्ना भाटियाची देखील झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची घोषणा 7 फेब्रुवारीला झाली होती. यानंतर चित्रपटातील जॉन आणि शर्वरीचा फर्स्ट लूक समोर आला होता. 'वेदा' चित्रपटात जॉन हा बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शर्वरी या टीझरमध्ये बॉक्सिंग शिकताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जॉन अब्राहमनं केली पोस्ट शेअर : जॉननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'वेदा' चित्रपटामधील पोस्टर आणि टीझर चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. दरम्यान जॉनचा फर्स्ट लूक एका फोटो याआधी समोर आला होता, ज्यात त्याचा चेहरा दिसत नव्हता. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये त्याच्या पाठीवर बंदूक आणि उजव्या हातात दुसरी बंदूक होती. त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर पांढऱ्या रंगाची पट्टीही बांधलेली होती. ऑलिव्ह कलरचे जॅकेट आणि ग्रे कार्गो पँटमध्ये दिसणारा जॉनचा हा लूक धमाकेदार होता. जॉनचा मास ॲक्शन चित्रपट 12 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
'वेदा' चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी करत आहेत. यापूर्वी जॉन आणि निखिलनं 'बाटला हाऊस' या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. 'वेदा' असिन अरोरा लिखित ॲक्शन ड्रामा असून हा चित्रपट झी स्टुडिओ, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि जॉन अब्राहम निर्मित आहे. दरम्यान, मीनाक्षी दास या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. जॉन अब्राहम या चित्रपटमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि स्टंट करताना दिसणार आहे. दरम्यान जॉनच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'पठाण' चित्रपटामध्ये शाहरुख खान समोर खलनायकाच्या रुपात दिसला होता. आता पुढं तो 'तेहरान' 'द डिप्लोमॅट' 'तारिक' 'राख' आणि 'हाऊसफुल 5' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :